हिंदी चित्रपटसृष्टीचा एक सुवर्णकाळ होता, जेव्हा दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी आणि जया प्रदा यांसारख्या अभिनेत्री वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत होत्या. त्यांच्या अभिनयानेच नव्हे तर सौंदर्यानेही चाहते प्रभावित झाले होते. त्या काळातही अभिनेत्रींमध्ये शीतयुद्ध अगदी सामान्य होते. जयाप्रदा आणि श्रीदेवी यांच्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. श्रीदेवी आणि जया प्रदा यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केले, पण दोघांनाही खऱ्या आयुष्यात एकमेकांचे तोंड पाहणेही पसंत नव्हते.
श्रीदेवी आणि जया प्रदा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी अनेक हिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली. इंडस्ट्रीतील महागड्या आणि यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत दोघांचीही नावं होती. जेव्हा या दोघांनी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले तेव्हा पडद्यावर त्यांच्यात खूप चांगले बाँडिंग दिसून आले, पण वास्तविक जीवनात त्यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू होते
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, इंडस्ट्रीतील बहुतेक लोकांना श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यातील शीतयुद्धाची माहिती होती. दोघांमध्ये सुरू असलेल्या भांडणाच्या दरम्यान, श्रीदेवी आणि जया यांना 'मकसद' चित्रपटात एकत्र काम करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये जितेंद्र आणि विनोद खन्ना या दोन अभिनेत्रींसोबत होते. विशेष म्हणजे जितेंद्र आणि विनोद खन्ना यांनाही त्यांच्या भांडणाची माहिती होती.
अशा परिस्थितीत जया आणि श्रीदेवी यांनी पॅचअप करावे, अशी दोघांचीही इच्छा होती, यासाठी त्यांनी एक योजना आखली. या दोन दिग्गज कलाकारांनी एकदा जया आणि श्रीदेवी यांना मेकअप रूममध्ये बंद केले होते. असे केल्याने त्या बोलतील असे त्यांना वाटले, पण सुमारे अडीच तासांनी जेव्हा मेकअप रूमचा दरवाजा उघडला तेव्हा ते दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले.
मेकअप रूमचा दरवाजा उघडल्यानंतर जया आणि श्रीदेवी दोघी एकमेकांकडे पाठ करून बसल्याचं दिसलं. सुमारे अडीच तास एकत्र बंदिस्त असूनही त्या एकमेकांशी बोलल्या नाहीत, त्यामुळे हे दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
2018 मध्ये जेव्हा श्रीदेवीने या जगाचा कायमचा निरोप घेतला तेव्हा जयाप्रदा खूप दुःखी झाल्या होत्या. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर जयाप्रदा यांना खूप पश्चाताप झाला