Uncategorized

कीर्तनाचा वारसा नव्या पिढीकडे पोहचविणारा नवा कार्यक्रम “वसा संस्कृतीचा – वारसा कीर्तनाचा” (New Program Based On Traditional ‘ Kirtan’ Appears On TV : An Effort To Attract Next Generation)

“ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस “…

महाराष्ट्राला लाभलेली आणि शतकांचा इतिहास असलेली आपली संत परंपरा. नवविधा भक्ती मधील दुसरी भक्ती म्हणजे कीर्तन.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असे आपण अभिमानाने म्हणतो आणि या आपल्या महान संतांनी त्यांचे विचार, त्यांची संत वाणी ही विविध अभंगातून आपल्याला सांगितली. पण सामान्य माणसाला त्यातला मतितार्थ समजणे तसे कठीणच आणि तिथेच तयार झाले आपले कीर्तनकार.

कोणत्याही जाती धर्माची बंधनं न पाळता केवळ भगवत भक्ती हा ज्याचा पाया आहे, अशा वारकरी संप्रदायाची, कीर्तनाची परंपरा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचवण्याचा मानस ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीचा आहे.

‘सन मराठी’ वाहिनी आपल्या संस्कृतीचा वसा आणि कीर्तनाचा वारसा जपण्यासाठी, पुढील पिढीकडे पोहचवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे आणि ते पाऊल म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत संतांचे विचार पोहचवणारा कार्यक्रम “वसा संस्कृतीचा – वारसा कीर्तनाचा”. नवीन वर्षाची सुरुवात अतिशय पारंपारिक विचारांनी होणार हे नक्की. ९ जानेवारी २०२४ पासून सकाळी ७:३० वाजता हा कार्यक्रम ‘सन मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळालेला वारसा, अविरतपणे पुढे नेण्याचा प्रयत्न ‘सन मराठी’ वाहिनीने केला असून ‘ह.भ.प. भगवतीताई सातारकर’, ‘ह.भ.प. चिन्मयदादा सातारकर’, ‘ह.भ.प.कांचनताई जगताप’, ‘ह.भ.प. शिवलीलाताई पाटील’, ‘ह.भ.प. सोहम महाराज काकडे’ यांचे उल्लेखनीय योगदान लाभले आहे.

आपले कीर्तनकार म्हणजे संतांचे फॅन फॉलॉवर्सच म्हणा ना. अगदी ज्ञानोबा तुकाराम माऊलींपासून निळोबांपर्यंत संतांनी केलेले अभंग समजून घेऊन, स्वतः आचरणात आणून ते महान विचार आणि त्यामागील अर्थ लोकांनां समजावणे म्हणजे कीर्तन. कीर्तनातून समाज सुधारण्याचे मोलाचे काम घडते. काही कीर्तनकार मूळ अभंगात सध्याच्या काळानुसार थोडे फार बदल घडवून सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्यामागील विचार लोकांना सांगतात. ऐकणारा श्रोता ऐकता ऐकता गुंग होईल आणि संतांचे महान विचार हे आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणतील याची खात्री कीर्तनकार घेत असतात.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षा: प्यार और रिश्ते की ख़ूबसूरत अलग परिभाषा देती ‘दो और दो प्यार’ (Movie Review: Do Aur Do Pyar)

रेटिंग: *** ऐसा क्यों होता है कि जिस रिश्ते में हमें सबसे ज़्यादा जुड़ाव और…

April 20, 2024

बर्लिनेल येथे जागतिक यशानंतर, आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनने आत्मपॅम्फलेट आणि झिम्मा 2 सह प्रादेशिक सिनेमांमध्ये उमटवल अव्वल ( Atmapamflet And Jhimma 2 wins Barlineil Internantion Award)

हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते आनंद एल राय यांनी आता त्यांच्या निर्मिती…

April 20, 2024

“राशी खूप हॉट दिसत आहे ” तमन्ना कडून राशीच्या लूकच कौतुक (Tamannaah Bhatia praises Raashi Khanna’s look in Armani 4 song ‘Achchacho)

अरनमानाई 4' ची सहकलाकार राशि खन्ना हीच सर्वत्र कौतुक होत असताना तमन्ना आणि राशी दोघी…

April 20, 2024
© Merisaheli