Marathi

आत्महत्येच्या विचारातून बाहेर पडण्यासाठी ए आर रहमान यांना आईने दिलेला महत्वाचा सल्ला ( A R Rahman Mother Helpes Him To Come Out From His Worst Day)

ऑस्कर विजेता ए आर रहमान यांनी मुलाखतीत आयुष्यातील कठिण काळाबद्दल सांगितले. मात्र कठीण काळात जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यात त्यांची आई आणि अध्यात्माने महत्त्वाची भूमिका बजावली.

वयाच्या २५ व्या वर्षी ते स्वत:ला अपयशी समजत होते. त्यामुळे रोज त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असत. ते म्हणाले, ‘मी लहान होतो तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे, त्यामुळे माझी आई म्हणायची, ‘जेव्हा तू इतरांसाठी जगशील तेव्हा तुझ्या मनात हे विचार येणार नाहीत.’ माझ्या आईकडून मला मिळालेला हा सर्वात सुंदर सल्ला आहे.

एआर रहमान पुढे म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही इतरांसाठी जगता आणि स्वार्थी नसता तेव्हा तुमच्या आयुष्याला एक अर्थ असतो. मी या गोष्टी खूप गांभीर्याने घेतले, मग तुम्ही एखाद्यासाठी काही कंपोज करत असाल, एखाद्यासाठी लिहित असाल, एका गरजूला अन्नदान करत…या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात.

‘वाईट काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. हे खूप लहान जग आहे. आपला जन्म झाला म्हणजे आपण हे जग सोडून जाणार आहोत. आपण कुठे जाणार हे माहित नाही. हे प्रत्येक व्यक्तीच्या विश्वासावर आणि त्याच्या स्वतःच्या कल्पनेवर अवलंबून आहे असे सांगत ए आर रहमान यांनी अध्यात्मावर फारसे बोलत नसल्याचे सांगितले.

एआर रहमान यांना विविध चित्रपटांसाठी पाच राष्ट्रीय पुरस्कार, २ ग्रॅमी, २ ऑस्कर, एक बाफ्टा, एक गोल्डन ग्लोब आणि १५  फिल्मफेअर पुरस्कारांसह जिंकले. २०१० मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कंगना रणौतला फुकट एवढी सिक्योरिटी, त्यापेक्षा सलमानला द्या… राखीची मोदींना विनंती ( Rakhi Sawant Request To Pm Modi For Increase Salman Khan Sequrity)

दुबईहून मुंबईत परतलेल्या राखी सावंतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता एक आवाहन केलं आहे. ती म्हणाली…

April 28, 2024

सोनू सूदचे व्हॉटस् अप अकाउंट बंद, अभिनेत्याने चाहत्यांना केली मदतीची विनंती (Sonu Sood Appeals To WhatsApp As His Account Gets Blocked)

गरजू लोकांचा कैवारी बनलेल्या अभिनेता सोनू सूदने ट्विट करून आपले व्हॉट्सॲप खाते बंद करण्यात आल्याचे…

April 28, 2024
© Merisaheli