बिस्किट चाट साहित्य: 1 पाकीट खारी बिस्किटे, अर्धा कप बुंदी, 1 चिरलेला कांदा, 1 चिरलेला टोमॅटो, 2 उकडलेले बटाटे, तिखट-गोड चटणी, 1 टीस्पून चाट मसाला, कोथिंबीर. कृती : बटाटे सोलून कापून घ्या. बिस्किटांचे लहान तुकडे करा. त्यात बुंदी, कांदा, टोमॅटो आणि बटाटा घालून मिक्स करा. चवीनुसार गोड आणि तिखट चटणी घाला. चाट मसाला घाला. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.
ढोकर दालाना
साहित्य: 200 ग्रॅम चणा डाळ, लहान आकारात कापलेला 1 बटाटा, 1 टेबलस्पून धणे पेस्ट, 1 टेबलस्पून जिरे पेस्ट, 1/4 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/4 टीस्पून हळद ,50 ग्रॅम दही, 2 टेबलस्पून आले पेस्ट ,4 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून तूप, चवीनुसार मीठ, गरम मसाला पावडर ( अख्खा गरम मसाला, धणे आणि जिरे भाजल्यानंतर पावडर बनवा).
कृती : चण्याची डाळ धुवून रात्रभर भिजत ठेवा. त्यात आले, मीठ आणि हिरवी मिरची टाकून पेस्ट बनवा. कढईत तेल गरम करून त्यात चणा डाळीची पेस्ट घाला. पाणी सुकेपर्यंत परतून घ्या. एका प्लेटमध्ये थोडे तेल लावून मिश्रण पसरवा. डायमंड शेपमध्ये कापून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. बटाटेपण तळून घ्या. आता या तेलात हळद, तिखट, मीठ आणि दही घालून धणे आणि जिरे पेस्ट परतून घ्या. मसाल्याला तेल सुटू लागले की त्यात पाणी आणि तळलेले बटाटे घाला. उकळायला लागल्यावर चण्याच्या डाळीचे कटलेट घालून 2 मिनिटे शिजवा. तूप आणि गरम मसाला घालून विस्तवावरून उतरवा.
दाल-पालक तो हमेशा बनाते हैं, चलिए इस बार सिंधी स्टाइल में बना हुआ दाल-पालक ट्राई…
INGREDIENTS3 cups mixed and boiled vegetables (peas, French beans, carrot, cauliflower, baby corn), ½ cup…
सध्या आंब्याचा मोसम सुरू आहे. तुम्ही पण आंब्याच्या नवनवीन रेसिपीज शोधत असाल तर आजची आपली…
उड़द दाल का दही वड़ा तो आप अक्सर खाते रहते हैं. चलिए आज हम आपको…
INGREDIENTS1 cup Arborio rice (well-cooked and sticky), 1 cup bell peppers, spring onions, zucchini, all…
INGREDIENTS3 potatoes, boiled and mashed, 1 cup mixed, boiled and half-mashed vegetables (peas, French beans,…