कोकोनट रोज सरबत आणि खस-कैरी सरबत (Coconut Rose Syrup And Khas-Kairi Syrup)

कोकोनट रोज सरबत


साहित्य : 1 शहाळ्याचे पाणी, अर्धी वाटी शहाळ्यातील मलई, 1 टेबलस्पून रोज सिरप, एक कप व्हॅनिला आइस्क्रीम.
कृती : काचेच्या ग्लासात प्रथम दोन चमचे रोज सिरप टाका. यावर शहाळ्याचे पाणी ओता. वरून व्हॅनिला आइस्क्रीमचा एक स्कूप टाका. आइस्क्रीमवर हळूच रोज सिरप ओता. जे ओघळल्याप्रमाणे दिसायला हवे. आइस्क्रीमशिवाय उरलेल्या भागात शहाळ्यातील मलईचे तुकडे ठेवा. स्ट्रॉसह हे सरबत सर्व्ह करा.

खस-कैरी सरबत


साहित्य : 2 टेबलस्पून खस सिरप, 2 कप कैरीचे तुकडे, 4 टेबलस्पून साखर, 500 मि.ली. लेमन फ्लेवर सोडा,
1 टीस्पून काळं मीठ, बर्फाचा चुरा.
कृती : कैरीचे साल काढून तुकडे करा. कैरीचे तुकडे आणि साखर एकत्र करून साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्या. हे मिश्रण थंड होऊ द्या. आता ग्लासमध्ये थोडेसे खस सिरप टाका. यावर कैरीचे मिश्रण टाका. यावर बर्फाचा चुरा टाका व यात लेमन सोडा ओता. आता काळं मीठ भुरभुरवून सरबत साधारण हलवा. पुन्हा खस सिरप टाका आणि खस-कैरी सरबत सर्व्ह करा.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

साउथ इंडियन फ्लेवर: रॉ मैंगो रसम (South Indian Flavour: Raw Mango Flavour)

लंच में रोटी-सब्ज़ी और दाल खाकर बोर हो गए हैं, तो चलिए आज ट्राई करते…

June 23, 2024

बिस्किट चाट आणि ढोकर दालाना (Biscuit Chaat And Dhokar Dalana)

बिस्किट चाट साहित्य: 1 पाकीट खारी बिस्किटे, अर्धा कप बुंदी, 1 चिरलेला कांदा, 1 चिरलेला…

June 22, 2024

CORN CHOWDER SOUP

Ingredients:1 tbsp butter, 1 cup corn (boiled), 1 tsp garlic, chopped, 1 tsp onion, chopped,…

June 21, 2024

परफेक्ट पार्टी ड्रिंक: लीची-रोज़ मोजितो (Perfect Party Drink- Lychee Rose Mojito)

बाजार में लीची की भरमार है. तो चलिए आज बच्चों को लीची रोज़ मोजितो बनाकर…

June 21, 2024

बटाटे कॉर्न पॅटीस आणि शाही बटाट्याचे भरीत (Potato Corn Patties And Mashed Potatoes)

बटाटे कॉर्न पॅटीस आणि शाही बटाट्याचे भरीतसाहित्य: 100 ग्रॅम उकडलेले बटाटे, 50 ग्रॅम उकडलेले मक्याचे…

June 21, 2024

व्हेज सिंक कबाब (Veg Sink Kebab)

साहित्य: 20 ग्रॅम उकडलेले बटाटे, 20 ग्रॅम पनीर, 20 ग्रॅम गाजर, 20 ग्रॅम फरसबी, 20…

June 20, 2024
© Merisaheli