Marathi

रामायणापूर्वी बी ग्रेड सिनेमात काम करत होत्या दीपिका चिखलिया, प्रेक्षकांमध्ये उमटलेले नाराजीचे सूर (Deepika Chikhalia Act In B grade Movie )

दीपिका चिखलियाचा जन्म २९ एप्रिल १९६५ रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीची कारकीर्द खूपच अनोखी ठरली आहे, आजच्या काळात तिला सर्वजण माता सीता म्हणून ओळखतात, पण एक काळ असा होता जेव्हा ती बी ग्रेड चित्रपटांची नायिका म्हणून ओळखली जात होती.

दीपिकाने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या १८ व्या वर्षी बी ग्रेड चित्रपटातून केली होती. नंतर त्यांनी सीतेच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले आणि त्यांची निवड झाली. त्यावेळी दीपिका फक्त २० ते २१ वर्षांच्या होत्या. रामानंद सागर यांच्या रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाला सीतेच्या रुपात पाहिल्यावर लोक तिला देव मानू लागले.

दीपिका चिखलियाने काही वर्षांपूर्वी एक चित्रपट केला होता ज्यामध्ये तिने एका दहशतवाद्याच्या पत्नीची भूमिका केली होती. त्या दहशतवादी अफजल गुरूची पत्नी आणि गालिबची आई बनली.

‘रामायण’मधील ‘सीता’ दहशतवाद्याची पत्नी बनल्याचे पाहून चाहत्यांनी त्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी दीपिकावर टीका करण्यास सुरुवात केली त्यामुळे खूप गोंधळ उडाला. या चित्रपटामुळे तिला खूप ट्रोलही करण्यात आले होते.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

फारच फिल्मी आहे महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची लव्हस्टोरी, आई सिनेमाच्या सेटवर झालेली ओळख (Mahesh Manjrekar And Medha Manjrekar Mate On Aai Movie Set, Know Their Filmy Lovestory)

मेधा मांजरेकर यांच्याशी महेश यांनी दुसरे लग्न केले होते. एका सिनेमाच्या सेटवर त्यांनी मेधा यांना…

April 29, 2024
© Merisaheli