प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला हदयविकाराचा झटका आला अन् चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याला तातडीनं मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत त्याला डिस्चार्जही देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान श्रेयस तळपदेची पत्नी दिप्ती, पतीच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देत म्हणाली की,”माझ्या पतीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. त्यांनी व्यक्त केलेली चिंता आणि शुभेच्छांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज मिळेल. त्याच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देताना मला समाधान मिळत आहे”.
त्याचबरोबर दिप्तीने चाहत्यांना भावनिक आवाहनही केलं आहे. ती म्हणाली,”या कठीण काळात बेलव्यू रुग्णालय आणि डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने वेळेवर दिलेला प्रतिसाद महत्तवाचा ठरला आहे. त्यामुळे त्यांचीही मी कृतज्ञ आहे. पण चाहत्यांना माझं भावनिक आवाहन आहे की, आमच्या गोपनीयतेचा कृपया आदर करावा. तुमचा अतूट पाठिंबा हाच आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्त्रोत आहे”.
श्रेयस तळपदेची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. श्रेयस तळपदे सध्या ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the Joungle) या सिनेमाचं शूटिंग करत आहे. तसेच कंगना रनौत (Kangana Ranaut) दिग्दर्शित ‘इमरजेंसी’ या सिनेमात तो दिसणार आहे. या बहुचर्चित सिनेमाचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.
सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू आहे. अरबाज खान याच्यानंतर…
इन दिनों अली गोनी और जैस्मिन अपनी शादी को लेकर खूब चर्चा में हैं. अली…
टीवी इंडस्ट्री की जानी-मानी एक्ट्रेस और कॉमेडियन-एक्टर कृष्णा अभिषेक (Krishna Abhishek) की बहन आरती सिंह…
Struggling With Your Investments? Shreeprakash Sharma offers Help! Ragini realised yet another financial year was…
तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण…
बॉलीवुड कपल रिचा चड्ढा और अली फजल के घर जल्द ही किलकारी गूंजने वाली हैं.…