Entertainment Marathi

‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकात लोकप्रिय अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे यांचं पुनरागमन (Dr Shweta Pendse Is In Perfect Murder Marathi Natak Will Make Come Back)

गेल्या काही वर्षांपासून अभिनयापासून लांब असलेल्या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचं लवकरच एका नाटकाद्वारे पुनरागमन होत आहे. या अभिनेत्रीचे रंगभूमीवरील पुनरागमन हे नाट्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकासाठी या अभिनेत्रीने खास खाकी वर्दी चढवली आहे. रहस्यांचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉक याच्या एका मर्डर मिस्ट्रीचे मराठीत रूपांतर करत लेखक निरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा उत्तम पट रंगमंचावर मांडला आहे. घटना-प्रसंगांतून निर्माण केलेले गूढ उकलताना केली जाणारी रहस्य आणि त्याची कल्पक मांडणी हे या नाटकाचं वैशिष्टय असून लवकरच या नाटकात अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे खाकी वर्दीत दिसणार आहे. आपल्या उत्तम अभिनयाने डॉ. श्वेता पेंडसे हिने अनेक भूमिका सशक्तपणे पेलल्या आहेत. तिच्या येण्याने नाटकाला कलाटणी मिळणार आहे. बदामराजा प्रॉडक्शन्स संस्थेच्या या नाटकाचे निर्माते माधुरी गवांदे, निनाद कर्पे आहेत.

गेली अनेक वर्ष नाट्यरसिकांचं मनोरंजन करीत या नाटकाने आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. खून लपवण्याचा आणि खुनामागचं खरं रहस्य उलगडण्याचा खेळ म्हणजे ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक. अनेक नावाजलेल्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. नाटकाला वेगळा ट्विस्ट देण्यासाठी अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे लेडी इन्स्पेक्टर म्हणून समोर येणार आहे. या वेगळ्या भूमिकेद्वारे ती या नाटकात पुनरागमन करते आहे.

‘सस्पेन्स थ्रीलर’ नाटक म्हटलं की कथेसोबत कलाकारांच्या अभिनयाचा कस असतो. माझ्यासाठी ही भूमिका तितकीच चॅलेंजिंग आहे” असं डॉ. श्वेता सांगते. ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचे लेखन आणि नेपथ्य नीरज शिरवईकर यांचं आहे. संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कहानी- दो जोड़ी मुस्कान… (Short Story- Do Jodi Muskan…)

पूनम ठिठक कर उसकी दंतुरित मुस्कान को देखती रही. कल बेवजह खिलौने ख़रीदने का मलाल…

September 8, 2024

तौबा तौबा फेम सिंगरला लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चपलेचा मार, व्हिडिओ होतोय व्हायरल (Fan Attacks ‘Tauba Tauba’ Singer Karan Aujla With Shoe At Live Concert)

लंडनमध्ये कॉन्सर्ट सुरू असताना एका चाहत्याने पंजाबी गायक करण औजला यांच्यावर बूट फेकून त्यांच्या तोंडावर…

September 8, 2024
© Merisaheli