Marathi

सर्वात मोठी चपाती बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भारताच्या नावावर (Guinness world record biggest chapati in the world is from india 145 kg jamnagar guajarat)

भारतीय खाद्यपदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत. चपाती हा भारतीय जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि नानपासून रोटीपर्यंत लोकांना तो खूप आवडतो. पण तुम्हाला माहीत आहे का की सर्वात मोठी चपाती बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही भारताच्या नावावर आहे. सर्वात मोठ्या चपातीचे वजन सुमारे १४५ किलो होते. ही चपाती खास प्रसंगी बनवली जाते आणि ही शेकडो लोकांचे पोट भरते.

जगातील सर्वात मोठी चपाती गुजरातमधील जामनगरमध्ये बनवली जाते. जामनगरमधील जलाराम बापा आणि दगडू सेठ गणपती सार्वजनिक उत्सवाच्या जयंतीला ही मोठी चपाती बनवली जाते. ही चपाती जलाराम मंदिराच्या जीर्णोद्धार समितीकडून बनवली जाते अन्‌ मंदिरात येणाऱ्या सर्व लोकांना दिली जाते. जामनगरच्या बाहेरूनही अनेक जण ही चपाती पाहण्यासाठी येतात.

विशेष म्हणजे ही मोठी चपाती बनवण्यासाठी एक नव्हे तर अनेक महिलांना एकत्र यावे लागते. मग अनेक तासांच्या मेहनतीनंतर ही चपाती तयार केली जाते. यासाठी भरपूर गव्हाचे पीठ लागते. जेव्हा ही चपाती तयार होते तेव्हा तिचे वजन सुमारे १४५ किलोपर्यंत असते. ही चपाती बनविण्यासाठी मंदिर समितीने खास तवा देखील बनवला आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

The S-Factor

If figures are to be believed, indian women continue to be among the most stressed…

May 16, 2024

चंदू चॅम्पियनच्या रोलसाठी स्टेरॉइड न घेता कार्तिक आर्यनने कमी केले फॅट्स, दिग्दर्शकाने केलं अभिनेत्याचं कौतुक (Kabir Khan Reveals Kartik Aaryan Brought Down Body Fat To 7 Percent From 39 Percent For ‘Chandu Champion’ Without Steroids)

कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट चंदू चॅम्पियन १४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.…

May 16, 2024

अनंत आणि राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग सेलिब्रेशन थेट समुद्राच्या मध्यभागी एका क्रुझवर (Anant Radhiks Second Pre-Wedding Celebration To Be Held In The Middle Of The Sea)

अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन…

May 16, 2024
© Merisaheli