Interior Marathi

आजचे आधुनिक स्वयंपाकघर (How To Makeover Your Kitchen With Modern Devices)

आज, पारंपरिक स्वयंपाकघर ही संकल्पना तंत्रज्ञान, डिझाइन आणि जीवनशैलीच्या प्रगतीमुळे आधुनिक बनली आहे. प्रत्येक घरातील अत्यंत महत्त्वपूर्ण जागा म्हणजे स्वयंपाकघर, जेथे जेवण तयार केले जाते आणि आकर्षक व चैतन्यशील जागा म्हणून देखील काम करते. आज स्वयंपाकघरामध्ये आमूलाग्र बदल घडून आला असला तरी सहजपणे स्वयंपाक करता येण्यासाठी मुबलक जागा किंवा स्टोरेज जागा यासंदर्भात स्वयंपाकघराच्या कार्यक्षमतेच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, ज्यामधून व्यक्तीला अधिक आरामदायीपणा व सोयीसुविधा मिळतील. अशी सूचना क्रॉम्पटन ग्रीव्हस कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या अप्लायन्स बिझनेसचे उपाध्यक्ष आनंद कुमार यांनी केली आहे.
आपण सध्या डिजिटल क्रांतीचे भोक्ते आहोत. त्यामध्ये नवनवीन, सोयीची उपकरणे बाजारात येऊ लागली आहेत. त्यांच्या मदतीने आपलेही स्वयंपाकघर आधुनिक बनवा.

मिक्सर ग्राइंडर
मिक्सर ग्राइंडर हे तुमच्या स्वयंपाकघरातील सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे. यामुळे तुमचा बराच वेळ वाचतो आणि स्वयंपाक करणे सोपे होते. विविध भाज्या व फळे कापणे, मिश्रण तयार करणे, बारीक करणे व मिक्स करणे यामुळे तुम्हाला अधिक सुरक्षित आणि जलदपणे स्वयंपाक करण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राइंडिंगमुळे तुमच्या पाककलेला उत्तम चव येते. बाजारात अनेक मिक्सर्स आहेत, पण जे मॅक्सिग्राइंड सारख्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करतात असे मिक्सर्स तुम्हाला त्वरित फायदेशीर ठरतील आणि जलदपणे स्वादिष्ट आहार तयार करण्यास मदत करतील.

एअरफ्रायर
वडा पाव, फ्राईज, भजी किंवा कटलेट असो, हे अस्सल व चपखल भारतीय स्ट्रीट फूड आपल्याला नेहमीच जास्त हवेहवेसे वाटतात. पण असे पदार्थ तळलेले आणि मोठ्या प्रमाणात तेलात शिजवलेले असतात, जे दीर्घकाळासाठी आपल्या आरोग्याकरिता चिंतेचे कारण बनू शकते. म्हणूनच, ती चव टिकवून ठेवण्यासोबत आरोग्यदायीपणाची खात्री देणारा एक उत्तम पर्याय एअर फ्रायर तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, जो तुम्हाला विविध प्रकारच्या स्वादिष्ट आणि आरोग्यदायी जेवणाचा आनंद घेण्यास मदत करतो.

राइस मेकर्स
प्रत्येक भारतीय जेवणामध्ये भात असतोच, त्याशिवाय अन्न अपूर्ण मानले जाते. पण तांदळाचे योग्य प्रमाण घेणे अवघड असल्यामुळे तांदूळ शिजवणे अत्यंत आव्हानात्मक होऊन जाते. ज्यामुळे तांदूळ उत्तमप्रकारे शिजला जात नाही. आज अधिक प्रगत राइस कुकर्स आहेत, जे अवघ्या 15 मिनिटांमध्ये उत्तमरीत्या शिजलेला भात देतात. यामुळे भात कमी शिजणे किंवा जास्त शिजणे किंवा भात करपून जाणे हे टाळण्यास मदत होते आणि दीर्घकाळपर्यंत भात शिजवण्याची वाट पाहण्याचा त्रास देखील दूर होतो. या कुकर्समध्ये कूकिंग भांडे आहे, जे प्रिमिअम फूड ग्रेड नॉन-स्टिक कोटिंगसह येते, ज्यामधून भात भांड्याला चिकटून न राहण्याची खात्री मिळते आणि भांडे देखील सहजपणे स्वच्छ करता येते.

इलेक्ट्रिक केटल
दिवसाच्या सुरुवातीला सेवन केले जाणारे चहा हे सर्वात लोकप्रिय पेय आहे. पण सकाळच्या वेळी उत्तम चहा तयार करणे त्रासदायक ठरू शकते. कधी-कधी वेळ वाचवण्यासाठी आपण गरम पाण्यामध्ये फायबरपासून बनवलेल्या चहा पावडरचा उपयोग करतो. परिणामत: चहामध्ये फायबर्सचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी चांगले नाही. सकाळच्या वेळी रिफ्रेश होण्याकरिता आणि कोणत्याही त्रासाशिवाय उत्तम चहाचा आस्वाद घेण्यासाठी हॉट केटल तुमचा परिपूर्ण सोबती ठरू शकतो. या हॉट केटल्समधील इंफ्यूजर रिमुव्हेबल तंत्र चहाला परिपूर्ण स्वाद देतात.

इंडक्शन कुकर
आधुनिक काळातील स्वयंपाकघर गॅस स्टोव्हशिवाय अपूर्ण आहे, जे अन्न तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अन्न उघड्या फ्लेम्सवर शिजवले जात असल्यामुळे एलपीजी गॅसने स्वयंपाक करणे सुरक्षित पर्याय नाही. असे केल्यास स्वयंपाक करताना तुमचे हात किंवा भांडी जळू शकतात. इंडक्शन कुकटॉप वापरणे हा स्वयंपाकाचा एक चांगला आणि अधिक आरामदायी प्रकार आहे, जो तुम्हाला अन्न जलद शिजवण्यास आणि तुमच्या वीज बिलात बचत करण्यास मदत करतो.

majhisaheli

Share
Published by
majhisaheli

Recent Posts

सलमानच्या गोळीबार प्रकरणात आरोपीने केली आत्महत्या, कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घ्यायला दिला नकार (Salman Khan Firing Case criminal Anuj Tahpan Family Seek Cbi Refuse To Take Deadbody)

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर १४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपी…

May 4, 2024

शिवांगी जोशी आणि कुशल टंडन लवकरच अडकणार विवाहबंधनात? (Is Shivangi Joshi Getting Married to Kushal Tandon )

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशी आणि कुशल टंडन या दोघांनी बरसातें- मौसम प्यार का…

May 3, 2024

आगामी निवडणूकांबाबत किरण माने यांनी मांडलं स्वत:च मत ( Kiran Mane Share Post On Upcoming Election )

सगळं इस्कटून सांगतो... नीट समजून घ्या. एकशे सेहेचाळीस खासदार निलंबित केले या हुकूमशहांनी. त्यातले अठ्ठ्याहत्तर…

May 3, 2024
© Merisaheli