FILM Marathi

यंदाचे दिल्ली रामलीला रावणदहन होणार कंगणा रणौतच्या हस्ते, ५० वर्षांत पहिल्यांदाच महिलेच्या हस्ते होणार हा कार्यक्रम ( kangana ranaut will do ravan dahan at delhi ramleela, she become first woman to do this)

दिल्लीतील यंदाचे रावण दहन थोडे वेगळे असणार आहे. यावेळी रावण दहनाचा बाण एका स्त्रीच्या हातून सुटणार आहे. ती महिला म्हणजे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आहे. खुद्द लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

‘लव कुश रामलीला’ समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी ही माहिती दिली की, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मंगळवारी, २४ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर दिल्लीतील प्रसिद्ध ‘लव कुश रामलीला’मध्ये रावण दहन करणार आहे. ते म्हणाले की, लाल किल्ल्यावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या ५० वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखादी महिला बाण मारून रावणाचे दहन करेल. महिला आरक्षण विधेयकाला संसदेने मंजुरी दिल्याने समितीने हा निर्णय घेतल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

५० वर्षात पहिल्यांदाच एक महिला रावण दहन करणार

अध्यक्षांनी ‘पीटीआय-भाषा’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘फिल्मस्टार राजकारणी यांसारखे व्हीआयपी आमच्या कार्यक्रमात दरवर्षी उपस्थित असतात. गेल्या काही वर्षांत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. चित्रपट अभिनेते अजय देवगण आणि जॉन अब्राहम देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. गेल्या वर्षी प्रभासने रावणाचे दहन केले होते. यावेळी, आमच्या कार्यक्रमाच्या ५० व्या वर्षी प्रथमच, एक महिला रावण दहन करणार आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

दैव (Short Stoy: Daiv)

-ऋषिकेश वांगीकरआपणच फक्त मागे राहिलो हे कळल्यावर त्या मुलाचे अवसान गळाले आणि कुठलाही विचार न…

April 11, 2024

ईदच्या मुहूर्तावर सलमान खानची चाहत्यांना खुशखबर, नव्या सिनेमाची घोषणा ( Salman Khan Announce His New Movie Name Sikandar )

सलमान खान आणि ईद हे समीकरण गेली बरीच वर्ष बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतं. पण यंदाची ईद…

April 11, 2024

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती (Marathi Actress Bhagyashree Mote Broke Engagement With Vijay Palande Shared Post)

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. भाग्यश्री हिने सोशल मीडियावर…

April 11, 2024

उकाडा कमी करणारा थंडावा कसा मिळवाल? (How To Get A Coolness That Reduces Heat?)

वाढता असह्य उन्हाळा, घामाच्या धारा नि थकलेलं शरीर ह्यामुळे जीव अगदी नको नकोसा होतो. परंतु…

April 11, 2024

जान्हवी आणि शिखर पहाडियाच्या नात्याला शिक्कामोर्तब, मैदानच्या स्क्रिनिंगला घातला प्रियकराच्या नावाचा नेकलेस (Janhvi Kapoor Confirms Dating Shikhar Pahariya, Wears Necklace with His Name )

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत होत्या.…

April 11, 2024
© Merisaheli