Marathi

आबासाहेबांच्या आयुष्याविषयी कुतूहल निर्माण करणारा ‘कर्मयोगी आबासाहेब’ (‘Karmayogi Abasaheb’Movie which creates curiosity about Abasaheb’s life)

सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांचं जीवन आणि कार्य आता चित्रपटातून उलगडणार आहे. “कर्मयोगी आबासाहेब” असं नाव असलेल्या या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला असून, आबासाहेबांच्या आयुष्याविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही जगभर रिलीज होत आहे.

मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. राजकीय विषयावरचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यासह राज्याला दिशा देणारे मा. गणपतराव देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेत त्यांचं महान कार्य समाजापुढे आणण्याचा प्रयत्न कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटातून करण्यात आला आहे. आबासाहेब अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांनाही संघर्ष चुकला नव्हताच. राजकारण, त्यातले डाव प्रतिडाव यापेक्षा समाजाचा विचार करत विकास, सुधारणा, शेतकरी, वंचित घटकांसाठी आबासाहेबांनी काम करण्यास प्राधान्य दिलं. म्हणूनच लोकांचं अलोट प्रेम त्यांच्या वाट्याला आलं. त्यांचा हा संघर्ष, लोकांनी केलेलं प्रेम, त्यांनी उभं केलेलं काम या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे कर्मयोगी आबासाहेब आता चित्रपटातून पुन्हा एकदा २५ ऑक्टोबरपासून भेटणार आहेत.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षा: सनी देओल की ‘जाट’ ने मचाया हर तरफ़ गदर… (Movie Review: Jaat)

सनी देओल की बुलंद आवाज़ और एक्शन के दीवानों के लिए बेहतरीन तोहफ़ा है जाट…

April 11, 2025

रणवीर सिंह- आज मैं जहां भी हूं, इन सबकी वजह से हूं… (Ranveer Singh- Aaj main Jahan bhi hoon, in sabki vajah se hoon…)

- मेरी ज़िंदगी में महिलाओं की अहम् भूमिका रही है. मेरी नानी, मां-बहन, पत्नी, सास…

April 11, 2025

पाकिस्तानच्या रेव्ह पार्टीत डान्स करतानाचा करीना कपूरचा व्हिडीओ होतोय व्हायरल… (Kareena Kapoor Khan Dance At Rave Party In Karachi AI Avatar Video Viral On Social Media)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.…

April 11, 2025
© Merisaheli