पनीर मालपोहा (Paneer Malpoha)

पनीर मालपोहा

साहित्य : 100 ग्रॅम पनीर, 3 टेबलस्पून मावा, 8 टीस्पून दूध, 1 टीस्पून पिठीसाखर, पाव टीस्पून वेलची पूड, 2 टेबलस्पून मैदा, 1 कप तूप, थोडे बदाम-पिस्त्याचे काप.

पाक तयार करण्यासाठी : 1 कप पाणी, 1 कप साखर, थोडा केशर, पाव टीस्पून वेलची पूड.
कृती ः मिक्सरमध्ये पनीर, मावा आणि 4 टीस्पून दूध घालून दाट मिश्रण तयार करा. त्यात पिठीसाखर, मैदा, वेलची पूड आणि उर्वरित दूध घालून व्यवस्थित फेटून घ्या. आता कढईमध्ये तूप गरम करत ठेवा. गरम तुपात पनीरचं 1 टेबलस्पून मिश्रण घालून दोन्ही बाजूने मंद आचेवर सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्या.

पाक तयार करण्यासाठी : एका पॅनमध्ये पाणी आणि साखर घालून उकळत ठेवा. त्यात केशर आणि वेलची पूड घालून दाट होईपर्यंत उकळवा. पाक तयार झाला की, त्यात मालपोहे घालून, दहा-पंधरा मिनिटं बुडवून ठेवा. नंतर हे मालपोहे सर्व्हिंग डिशमध्ये ठेवून त्यावर बदाम-पिस्त्याचे काप पसरवा आणि सर्व्ह करा.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

समर कूल: 10 मिनट चिक पी सलाद (Summer Cool: 10 Mintues Chik Pea Salad)

गर्मियों में दाल-चावल और रोटी-सब्ज़ी खाकर बोर हो गए हैं, तो चलिए बनाते हैं 10…

May 21, 2024

पेरू पंच आणि सीताफळ मिल्कशेक (Amrood Punch And Sitafal Milkshake)

पेरू पंचसाहित्य : 200 मि.ली. पेरूचा रस, 1 टीस्पून कॅप्सिको सॉस (बाजारात उपलब्ध), 1 लिंबाचा…

May 21, 2024

Sashimi Salad

IngredientsTuna, Salmon, Kampachi, Cos romaine, Iceberg lettuce, Rocket leaves, Sesame oil, Lemon juice, Soya sauce,…

May 20, 2024

टोमॅटोचं लोणचं (Tomato Lonche 1)

साहित्य : 1 किलो लाल टोमॅटो, 3 टेबलस्पून लाल मिरची पूड, 3 टेबलस्पून पिवळी मोहरी…

May 20, 2024

फ्लॉवर-ब्रोकोलीचं लोणचं (Flower Broccoli Lonche)

साहित्य : 1 किलो फ्लॉवर, अर्धा किलो ब्रोकोली, 250 ग्रॅम पिवळी मोहरी, 1 टेबलस्पून हळद,…

May 18, 2024

MANGO JALEBI

Ingredients1 Alphonso ripe mango, 300 gm sugar, 1 gm kesar, 250 ml water, 250 ml…

May 17, 2024
© Merisaheli