Marathi

संक्रांतीला ‘लोकशाही’ चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित (Poster Of Political Marathi Film ” Lokshahi ” Launched On The Occasion of Makar Sankranti)

वारसा आपल्या भारत भूमीला थेट प्राचीन महाभारतापासून लाभलेला आहे. सुशीलकुमार अग्रवाल निर्मित ‘लोकशाही’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून घराणेशाहीतला हा सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शाश्वत शाप हा प्रश्न उपस्थित होत आहे. चार दशकांहून अधिक भारताच्या सिनेसृष्टीत आपला झेंडा मानाने उंचावून फडकवत आलेली ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड’, ‘लोकशाही’ चित्रपट प्रस्तुत करत आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लोकशाही’च्या दृकश्राव्य गतिशिल शीर्षक पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनामनात उत्सुकता निर्माण झाली होती. १५ जानेवारी २०२४ म्हणजे आज मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या मुख्य पोस्टरने आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेबरोबरच विलक्षण प्रश्नांची ठिणगी पेटवली आहे. पोस्टरमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे विचारमग्न गंभीर अशा अवस्थेत असून समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अमराठी अभिनेता अंकित मोहन हात जोडून लाखोंच्या संख्येत असणाऱ्या जनतेसमोर काहीतरी आव्हान करत असल्याचे दिसत आहे. नेमके हे आव्हान काय असणार आहे? आणि या आव्हानाला जनतेचा काय कौल असणार आहे? हे गुपित प्रेक्षकांच्या उत्सुकतेला ठळक साद घालत आहे.

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवणारा ‘लोकशाही’ चित्रपट संजय अमर यांनी दिग्दर्शित केला असून येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ‘लोकशाही’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहात महाभारतातील पात्रे आणि त्यांच्या सत्ता संघर्षासारखाच आजच्या कलियुगातील माणसांच्या राजकारण आणि राजघराण्यातील सत्तासंघर्षाचा विलक्षण अनुभव घेता येणार आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षा: प्यार और रिश्ते की ख़ूबसूरत अलग परिभाषा देती ‘दो और दो प्यार’ (Movie Review: Do Aur Do Pyar)

रेटिंग: *** ऐसा क्यों होता है कि जिस रिश्ते में हमें सबसे ज़्यादा जुड़ाव और…

April 20, 2024

बर्लिनेल येथे जागतिक यशानंतर, आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनने आत्मपॅम्फलेट आणि झिम्मा 2 सह प्रादेशिक सिनेमांमध्ये उमटवल अव्वल ( Atmapamflet And Jhimma 2 wins Barlineil Internantion Award)

हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते आनंद एल राय यांनी आता त्यांच्या निर्मिती…

April 20, 2024

“राशी खूप हॉट दिसत आहे ” तमन्ना कडून राशीच्या लूकच कौतुक (Tamannaah Bhatia praises Raashi Khanna’s look in Armani 4 song ‘Achchacho)

अरनमानाई 4' ची सहकलाकार राशि खन्ना हीच सर्वत्र कौतुक होत असताना तमन्ना आणि राशी दोघी…

April 20, 2024
© Merisaheli