बटाटे कॉर्न पॅटीस आणि शाही बटाट्याचे भरीत (Potato Corn Patties And Mashed Potatoes)

बटाटे कॉर्न पॅटीस आणि शाही बटाट्याचे भरीत
साहित्य: 100 ग्रॅम उकडलेले बटाटे, 50 ग्रॅम उकडलेले मक्याचे दाणे, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा अर्धा टीस्पून जिरे पावडर, चाट मसाला, लाल तिखट, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ
कृती: एका भांड्यात पॅटीसचे सर्व साहित्य एकजीव करुन पॅटीस बनवा. कढईत तेल गरम करून पॅटीस सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. पॅटीस एका प्लेटमध्ये कापून ठेवा. रायता आणि तिखट-गोड चटणी बरोबर सर्व्ह करा.

शाही बटाट्याचे भरीत
साहित्य: 4 उकडलेले बटाटे, 1 चमचा तेल,1 चमचा जिरे, 2 चिरलेले कांदे, 2हिरव्या मिरच्या चिरलेल्या, चवीनुसार मीठ, गरम मसाला पावडर, चिरलेली कोथिंबीर, कोळशाचा तुकडा,1 टीस्पून तूप.
कृती : बटाटे सोलून चांगले मॅश करा. कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. आता कांदे आणि हिरवी मिरची 4-5 मिनिटे परतून घ्या. मॅश केलेले बटाटे आणि मसाले घालून ढवळा. विस्तवावर दोन-तीन कोळशाचे निखारे गरम करा. कोळसा गरम झाल्यावर हीटप्रूफ डब्यात ठेवा. आता हा डबा तयार भरीतावर ठेवा. कोळशावर तूप सोडून कढई झाकून ठेवा आणि जेव्हा कढईत कोळशाचा धूर भरले तेव्हा झाकण काढून गरमागरम सर्व्ह करा.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

मोतीवाले चॉप्स (Motiwale Chops)

साहित्य: 2 किसलेले बीट, 2 उकडलेले व मॅश केलेले बटाटे, 2 टीस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा टीस्पून…

July 22, 2024

कॉर्न मैजिक: कॉर्न-कुकुंबर सलाद (Corn Magic: Corn-Cucumber Salad)

आजकल बाजार में कॉर्न की बहार है. कॉर्न को आपने भूनकर, उबालकर और उसके पकौड़े…

July 21, 2024

व्हेज सोया बिर्याणी (Veg Soya Biryani)

साहित्य: २ कप तांदूळ (मीठ घालून शिजवलेले) १/४ कप मिश्र भाज्या (चिरलेल्या) सोयाचे तुकडे २…

July 20, 2024

मैंगो मैजिक: मैंगो सागो डेज़र्ट (Mango Magic: Mango Sago Dessert)

आज हम आपके लिए लेकर आएं हैं मैंगो से बनने वाली एक टेस्टी और क्विक…

July 20, 2024

राइस कॉर्नर: वेज सोया बिरयानी (Rice Corner: Veg Soya Biryani)

बिरयानी तो आपने कई तरह की खाई होंगी, पर क्या आपने वेज सोया बिरयानी कभी…

July 18, 2024

चिली गार्लिक बटाटे आणि उपवासाचा बटाटा वडा (Chili Garlic Potatoes And Fasting Potato Vadas)

चिली गार्लिक बटाटेसाहित्य : 4-5 लांब कापलेले बटाटे, बारीक चिरलेला पातीचा कांदा, 1-1 टीस्पून चिरलेला…

July 18, 2024
© Merisaheli