FILM Marathi

डॉन ३ मध्ये शाहरुखच्या जागी रणवीर सिंहची वर्णी, फरहान अख्तरने शेअर केला चित्रपटाचे अनाउंसमेंट टिझर (Ranveer Singh Replaces Shah Rukh Khan, Farhan Akhtar shareTeaser to Reveal First Look)

चित्रपट निर्माता फरहान अख्तरने अखेर त्याच्या आगामी चित्रपट डॉन 3 बद्दल खुलासा केला आहे. त्याच्या चित्रपट डॉन 3 मध्ये शाहरुख खानऐवजी रणवीर सिंग डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन-२ मध्ये शाहरुख खान डॉन झाला होता. पण फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात रणवीर सिंग डॉनच्या रुपात नवा डॉन बनणार आहे.

चित्रपट निर्माता फरहान अख्तरने त्याच्या डॉन 3 चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे आणि घोषणा केली आहे की त्याच्या डॉन 3 चित्रपटात शाहरुख खानची जागा  रणवीरने घेतली आहे. शेअर केलेल्या टीझरची सुरुवात रणवीरच्या डायलॉगने होते आणि शेवटी त्याचा चेहरा समोर येतो. व्हिडीओ शेअर करताना फरहान अख्तरने लिहिले – एक नवीन युग सुरू झाले आहे. डॉन 3.

शेअर केलेल्या टीझर व्हिडिओमध्ये रणवीर सिंग डॉनच्या भूमिकेत पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये, शहरातील सर्वात उंच इमारतीमधील स्कायलाइनसमोर एक अपार्टमेंट उघडते आणि पार्श्वभूमीत रणवीर सिंगचा आवाज ऐकू येतो  शेर जो सो रहा है, वो जागेगा कब? पूछते हैं ये सब, उनसे कह दो, फिर जाग उठा हूं मैं. और फिर सामने जल्द आने को. क्या है ताकत मेरी, क्या है हिम्मत मेरी. फिर दिखाने को. मौत से खेलना जिंदगी है मेरी. जीतना ही मेरा काम है. तुम तो हो जानते. जो मेरा बाप है। 11 मुल्कों की पुलिस ढूंढती है मुझे, मगर पकड़ पाया है कौन. मैं हूं डॉन.’

यादरम्यान, रणवीर स्टेटमेंट शेड्स घालतो, सिगारेट ओढतो आणि टिपिकल डॉन स्टाईलमध्ये रिव्हॉल्व्हर फायर करतो. एक्सेल एंटरटेनमेंटच्या रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरचा हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

मलायका अरोरा देखील करणार दुसरं लग्न, लग्नाची पत्रिका घेऊन पोहोचली पहिल्या पतीच्या घरी? (Malaika Arora Reached Her First Husband Arbaaz Khans House For Gave Her Marriage Card)

सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू आहे. अरबाज खान याच्यानंतर…

April 30, 2024

Invest Smart, Retire Rich

Struggling With Your Investments? Shreeprakash Sharma offers Help! Ragini realised yet another financial year was…

April 30, 2024

अधिपतीच्या आयुष्यात नवीन मास्तरीणबाईंची एण्ट्री, भुवनेश्वरीची नवी चाल, प्रोमो व्हायरल ( Zee Marathi Serial Tula Shikwin Changlach Dhada New Promo Viral )

तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण…

April 30, 2024
© Merisaheli