अभिनेता अरबाज खानने शुक्रवारी आपला 56 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी, अभिनेत्याने त्याचे कुटुंब आणि मित्रांसह पार्टी साजरी केली. सलमान खान देखील त्याच्या भावाच्या वाढदिवसाच्या पार्टीत टाय-डायड गुलाबी पँटसह राखाडी टी-शर्ट घालून दिसला होता. भाईजानला त्याच्या लूकमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान काल रात्री त्याचा भाऊ अरबाज खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर सलमान खानने पापाराझींना जबरदस्त पोज दिली. भाईजानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
पापाराझी अकाऊंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान प्रिंटेड गुलाबी डेनिम आणि ब्लॅक शूजसह ब्लॅक टी-शर्ट आणि ग्रे जॅकेट घातलेला दिसत होता. नेहमीप्रमाणे तो पिरोजा ब्रेसलेट आणि सिल्व्हर पिरोजा घड्याळ घालून आलेला. तसे, चाहत्यांना त्याचा देखणा लुक नेहमीच आवडतो.
पण यावेळी त्याला त्याच्या लूकमुळे खूप ट्रोल केले जात आहे. सोशल मीडिया यूजर्स भाईजानची ही स्टाईल म्हणजे गुलाबी पँट बार्बीपासून प्रेरित असल्याचे सांगत आहेत.
एका चाहत्याने सलमानचा हा लूक बार्बीपासून प्रेरित असल्याचे सांगितले आहे. तर दुसर्याने लिहिले आहे – एकटा सलमानच बार्बी ओपेनहाइमरला प्रमोट करत आहे असे दिसते असे म्हटले. आणखी एकाने लिहिले आहे की, सलमानही बार्बी चॅलेंज फॉलो करत आहे का?
सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू आहे. अरबाज खान याच्यानंतर…
इन दिनों अली गोनी और जैस्मिन अपनी शादी को लेकर खूब चर्चा में हैं. अली…
टीवी इंडस्ट्री की जानी-मानी एक्ट्रेस और कॉमेडियन-एक्टर कृष्णा अभिषेक (Krishna Abhishek) की बहन आरती सिंह…
Struggling With Your Investments? Shreeprakash Sharma offers Help! Ragini realised yet another financial year was…
तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण…
बॉलीवुड कपल रिचा चड्ढा और अली फजल के घर जल्द ही किलकारी गूंजने वाली हैं.…