Marathi

पुन्हा एकदा शाहिद कपूरने खरेदी केली अलिशान प्रॉपर्टी, किंमत वाचून बसेल धक्का ( Shahid Kapoor buys luxury sea-view apartment in Mumbai)

शाहिद कपूर आणि पत्नी मीरा कपूर बी-टाऊनच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत आणि अनेकदा सोशल मीडिया पोस्टद्वारे कपल गोल देतात. त्याच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. शाहिद कपूर प्रॉपर्टीमध्ये खूप गुंतवणूक करतो. आता त्याने मुंबईत एक नवीन आणि आलिशान अपार्टमेंट विकत घेतले आहे ज्याची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल.

रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी ही प्रॉपर्टी मुंबईच्या एका पॉश भागात खरेदी केली आहे. त्यांचा फ्लॅट खूप आलिशान आहे. हे अपार्टमेंट मुंबईच्या वरळी भागात आहे. IndexTap.com च्या नोंदणीकृत कागदपत्रांनुसार, हे अपार्टमेंट ५३९५ स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. शाहीद आणि मीराचे अपार्टमेंट वरच्या मजल्यावर आहे. तीन पार्किंग एरिया असलेल्या या आलिशान अपार्टमेंटसाठी शहीद कपूरने 59 कोटी रुपये दिले आहेत. हे अपार्टमेंट ओबेरॉय 360 वेस्ट प्रकल्पाचा भाग आहे आणि या अपार्टमेंटची नोंदणी 24 मे रोजी झाली होती. यासोबतच या जोडप्याने 1.75 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरले आहे.

रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, कपूर कुटुंबाने ओबेरॉय रियल्टीची ही मालमत्ता चांडक रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केली आहे. चांडक रियल्टर्सने हे अपार्टमेंट विकत घेतले होते आणि आता ते शाहिदला विकले आहे.

शाहिद या नवीन घरात कधी शिफ्ट होणार हे अद्याप कळलेले नाही. याआधी 2018 मध्ये देखील शाहिदने याच बिल्डिंगमध्ये अपार्टमेंट खरेदी केले होते. तेव्हा त्या अपार्टमेंटची किंमत 55.60 कोटी रुपये होती.

शाहिद कपूर शेवटचा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ मध्ये क्रिती सेननसोबत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. सध्या तो ‘देवा’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

व्यंग्य- आप कुछ समझते क्यों नहीं? (Satire- Aap Kuch Samjhte Kyon Nahi?)

बॉस थक जाते हैं, कहते है, “यार ये कुछ समझाता क्यों नहीं."और मुझे लगता है,…

July 22, 2024

श्रावण मास पर विशेष: कहानी- हम में शक्ति हम में शिव… (Short Story- Hum Mein Shakti Hum Mein Shiv…)

तभी मां जो शिव की अनन्य भक्त थीं, बोलीं, ''बेटा! जहां ईश्वर हों, वहां आस्था…

July 22, 2024
© Merisaheli