Entertainment Marathi

सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर या बेमिसाल जोडीच्या नव वर्षातील नव्या चित्रपटाची घोषणा ‘श्रीदेवी प्रसन्न’ (Siddharth Chandekar And Sai Tamhankar New Movie ‘Sridevi Prasanna’ Announcement)

२०२४ ला लवकरच सुरुवात होणार आहे. या वर्षात अनेक हिंदी-मराठी सिनेमांची पर्वणी लोकांना पाहायला मिळणार आहे. मनोरंजन हा आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच चित्रपटसृष्टीशी संबंधित कल्लाकार नवनवे विषय घेऊन आपल्या रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतात.

अशातच २०२४ मधील नवीन मराठी सिनेमाची घोषणा झालीय. सिनेमाचं नाव आहे श्रीदेवी प्रसन्न. नाव वाचून प्रसन्न वाटलं तरी सिनेमात काय असेल याबद्दल काही तर्क लावता येतोय का? नाही ना. जाणून घेऊया.

“श्रीदेवी प्रसन्न” या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वासह बॉलीवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि स्मार्ट अँड डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहे.

आजवर अनेक हीट चित्रपट देणारे हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी फुलवणार आहेत. या निमित्ताने नव्या वर्षात, एक नवी आणि आगळीवेगळी लव्ह स्टोरी आपल्या लाडक्या जोडीसह प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेसह सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वांखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे अशी दमदार कास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे श्रीदेवी आणि प्रसन्न यांच्या लव्हस्टोरी सोबत हा एक कंप्लीट फॅमिली सिनेमा असणार यात शंका नाही.

या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लवकरच हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे.

हा सिनेमा २ फेब्रुवारी २०२४ पासून जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षा: प्यार और रिश्ते की ख़ूबसूरत अलग परिभाषा देती ‘दो और दो प्यार’ (Movie Review: Do Aur Do Pyar)

रेटिंग: *** ऐसा क्यों होता है कि जिस रिश्ते में हमें सबसे ज़्यादा जुड़ाव और…

April 20, 2024

बर्लिनेल येथे जागतिक यशानंतर, आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनने आत्मपॅम्फलेट आणि झिम्मा 2 सह प्रादेशिक सिनेमांमध्ये उमटवल अव्वल ( Atmapamflet And Jhimma 2 wins Barlineil Internantion Award)

हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते आनंद एल राय यांनी आता त्यांच्या निर्मिती…

April 20, 2024

“राशी खूप हॉट दिसत आहे ” तमन्ना कडून राशीच्या लूकच कौतुक (Tamannaah Bhatia praises Raashi Khanna’s look in Armani 4 song ‘Achchacho)

अरनमानाई 4' ची सहकलाकार राशि खन्ना हीच सर्वत्र कौतुक होत असताना तमन्ना आणि राशी दोघी…

April 20, 2024
© Merisaheli