शिवानी सुर्वे लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटामध्ये शिवानी सुर्वेसोबत अभिनेता भूषण प्रधान मुख्य भूमिकेत आहे.
मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे काही दिवसांपूर्वी विवाहबंधात अडकली. शिवानी सुर्वेने बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या शिवानी तिची मॅरीड लाईफ इन्जॉय करत आहे. अशामध्ये शिवानी सुर्वेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शिवानी सुर्वे लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटामध्ये शिवानी सुर्वेसोबत अभिनेता भूषण प्रधान मुख्य भूमिकेत आहे. शिवानी- भूषणच्या ‘ऊन सावली’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
शिवानी सुर्वे आणि भूषण प्रधान स्टारर ‘ऊन सावली’ या चित्रपटाच्या टीझर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. टीझर आणि गाणी पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरला देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. १५ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
ऊन सावली हा चित्रपट प्रणय आणि आन्वीची प्रेमकथा आहे. ‘एक अरेंज मॅरेज ही अद्भूत लव स्टोरी असू शकते’ या वाक्यात ‘ऊन सावलीचे’ गूढ लपलेले आहे. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहणारे हे सुंदर जोडपं बरंच काही सांगू पाहत आहेत, बरंच काही बोलू इच्छित आहेत. पहिल्या भेटीतच प्रणयला आन्वी आवडते. परंतु आन्वीचा विरोध हा कायम आहे. तिच्या मनात तर वेगळाच गोंधळ चालू आहे. हे आगळे वेगळे प्रेम पाहण्यासाठी प्रेक्षकांना १५ मार्चची वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट लग्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःशी जोडणारा आहे.
तिकीट विंडो पिक्चर्स बॅनरअंतर्गत समीर ए शेखद्वारा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच निर्देशन दिवाकर नाईक यांनी केले आहे. सार्थक नकुल यांनी हा चित्रपट संगीतबद्ध केला आहे. भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. तर, अजिंक्य ननावरे, राज सरनागत, अंकिता भोईर, विकास हांडे, श्वेता कामत, प्रिया तुळजापूरकर आणि मनाली निकम यांचा देखील समावेश आहे. हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सनी देओल की बुलंद आवाज़ और एक्शन के दीवानों के लिए बेहतरीन तोहफ़ा है जाट…
- मेरी ज़िंदगी में महिलाओं की अहम् भूमिका रही है. मेरी नानी, मां-बहन, पत्नी, सास…
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.…
आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) की पत्नी और फिल्म प्रोड्यूसर- राइटर ताहिरा कश्यप (Ayushmann Khurrana's wife…
पिछले कई सालों से कपूर सिस्टर्स (Kapoor Sisters) ने अपनी शानदार एक्टिंग से न सिर्फ…
सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट निर्मात्यांच्या आणि स्वतः भाईजानच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. चित्रपटाचा खर्च…