Marathi

सर्वात महागडा ख्रिसमस ट्री कधी आणि कुठे बनवला गेलाय माहिती आहे? (World’s Most Expensive Christmas Tree)  

आज जगात सर्वत्र ख्रिसमसचा सण साजरा होत आहे. २५ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या या सणाची खास गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी सजवलेले ख्रिसमस ट्री. मॉल असो की दुकान, ऑफिस असो की घर. सर्वत्र रंगीबेरंगी ख्रिसमस ट्री सजवलेले दिसतात. या सजावटीशिवाय ख्रिसमसचा सण खूपच निस्तेज दिसतो. कुठे लहान ख्रिसमस ट्री आहेत तर कुठे मोठे, पण सर्वात महागडा ख्रिसमस ट्री (World’s Most Expensive Christmas Tree) कधी आणि कुठे बनवला गेलाय, हे तुम्हाला माहिती आहे का?

आतापर्यंत सर्वात महागड्या अशा ३ ख्रिसमस ट्रींचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. हे तीन ख्रिसमस ट्री जगातील ३ वेगवेगळ्या देशांमध्ये बनवले गेले आहेत. त्यापैकी सर्वात महागडा ख्रिसमस ट्री स्पेनमध्ये आणि दुसरा सर्वात महागडा ख्रिसमस ट्री अबू धाबीमध्ये बनवण्यात आला. यानंतर तिसरा सर्वात महागडा ख्रिसमस ट्री जपानची राजधानी टोकियोमध्ये बनवण्यात आला आहे.

स्पेनमधील सर्वात महाग ख्रिसमस ट्री

२०१९ मध्ये, स्पेनमधील मार्बेला येथील केम्पिंस्की हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांना त्यांच्यासमोर हिरे आणि दागिन्यांनी भरलेले झाड पाहून आश्चर्य वाटले. सुमारे १५ फूट उंचीचे हे ख्रिसमस ट्री अनेक हिरे आणि डिझायनर दागिन्यांनी सजले होते. त्यावर लाल, पांढरा, गुलाबी आणि काळ्या रंगाचे हिरे होते. हे झाड डेबी विंगहॅमने डिझाइन केले होते, ज्याची किंमत सुमारे १२५ कोटी रुपये आहे.

दुबईत बनवलेले दुसरे महागडे ख्रिसमस ट्री

अनेक वर्षांपूर्वी म्हणजे २०१० मध्ये अबुधाबीच्या एमिरेट्स पॅलेस हॉटेलमधील ख्रिसमस ट्री ब्रेसलेट, नेकलेस आणि घड्याळांनी सजवण्यात आले होते. त्यात अनेक हिरे, महागडे खडे आणि सुंदर डिझायनर ज्वेलरी वापरण्यात आली होती. या ख्रिसमस ट्रीची किंमत सुमारे ९१.३ कोटी रुपये होती. त्यानंतर त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले.

तिसरा सर्वात महाग ख्रिसमस ट्री

२०१६ मध्ये, जपानची राजधानी टोकियो येथील ज्वेलर्स गिन्झा तनाका यांनी त्यांच्या दुकानात सोन्याच्या तारांनी बनवलेले ख्रिसमस ट्री सजवले होते. ते बनवण्यासाठी ४,००० फूट पातळ सोन्याच्या तारांचा वापर करण्यात आला. या ख्रिसमस ट्रीची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे.

अशाप्रकारे आपण पाहिले, की या ख्रिसमसच्या ट्रीची किंमत इतकी जास्त आहे की तुम्ही त्याची किंमत मोजून डझनभर मर्सिडीज आणि फेरारी खरेदी करू शकता. या दोन्ही कारची कमाल किंमत ३ ते ४ कोटी आहे. याशिवाय, जर तुम्हाला मुंबईच्या पॉश भागात व्हिला घ्यायचा असेल तर तुम्ही डझनभर व्हिला खरेदी करू शकता. विराट कोहलीने नुकताच अलिबागमध्ये २,००० स्क्वेअर फुटांचा व्हिला खरेदी केला आहे, ज्याची किंमत सुमारे ६ कोटी रुपये आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कंगना रणौतला फुकट एवढी सिक्योरिटी, त्यापेक्षा सलमानला द्या… राखीची मोदींना विनंती ( Rakhi Sawant Request To Pm Modi For Increase Salman Khan Sequrity)

दुबईहून मुंबईत परतलेल्या राखी सावंतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता एक आवाहन केलं आहे. ती म्हणाली…

April 28, 2024

सोनू सूदचे व्हॉटस् अप अकाउंट बंद, अभिनेत्याने चाहत्यांना केली मदतीची विनंती (Sonu Sood Appeals To WhatsApp As His Account Gets Blocked)

गरजू लोकांचा कैवारी बनलेल्या अभिनेता सोनू सूदने ट्विट करून आपले व्हॉट्सॲप खाते बंद करण्यात आल्याचे…

April 28, 2024
© Merisaheli