Entertainment Marathi

शरद पोंक्षे आणि स्नेह ही बाप-लेकाची जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार (Actor Sharad Ponkshe And Sneh Ponkshe New Movie Banjara )

अभिनेते शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेह पोंक्षे याने सिनेमा क्षेत्रात पदार्पण केलं आहे. बाबांसोबत तो पहिला सिनेमा करतोय. बंजारा असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन स्नेहने केलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे एक नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेह पोंक्षे सिनेसृष्टीत पदार्पण करतो आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षे आणि त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. वडील मुलाची ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता याचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे. ‘बंजारा’ असं स्नेह आणि शरद पोंक्षे यांच्या सिनेमाचं नाव आहे.

आयुष्याच्या प्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे, प्रथम झलक पाहून कळतेय. चित्रपटाचे नाव जरी जाहीर झाले असले तरी या चित्रपटात कोणकोण कलाकार झळकणार, हे जाणून घेण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करीत असलेल्या या चित्रपटाचे शरद पोंक्षे आणि रोहिणी विजयसिंह राजे पटवर्धन निर्माते आहेत. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे सिक्कीममध्ये झाले आहे.

शरद पोंक्षे यांनी नाटक, मालिका, चित्रपट या कलेच्या विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर ‘बंजारा’ चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वैशिष्टय म्हणजे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे करणार आहे. दिग्दर्शक म्हणून स्नेहचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट आणि मनोरंजनात्मक पाहायला मिळणार आहे.

या नव्या सिनेमाविषयी शरद पोंक्षे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लेकाच्या चित्रपटाच्या माध्यमातून मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. यापेक्षा वेगळा आनंद काही असूच शकत नाही. स्नेहच्या मनात ‘बंजारा’चा विचार आल्यापासून ते चित्रीकरणापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. विषय वेगळा आहे. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे. खरंतर आयुष्यात प्रत्येक मनुष्य हा ‘बंजारा’ असतोच. चित्रपट पाहाताना याचा अनुभव येईलच, असं शरद पोंक्षे म्हणालेत.

स्नेह पोंक्षेची प्रतिक्रिया काय?

वडिलांसोबत प्रथमच काम करत आहे. त्यांच्या अनुभवाची मला खूपच मदत झाली. कुठे जायचंय, यापेक्षा तिथे जायचा प्रवास आनंददायी हवा, परंतु याच आनंदाला आपण बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा ‘बंजारा’ आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल, असं स्नेह पोंक्षे याने म्हटलं आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षाः मेट्रो… इन दिनों- रिश्ते और प्यार से जूझती रोमांटिक म्यूज़िकल जर्नी… (Movie Review: Metro… In Dino)

रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…

July 4, 2025

पहला अफेयर- तीन दिवसीय प्यार! (Love Story- Teen Divasiy Pyar)

वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…

July 4, 2025

कहानी- आपने कहा था (Short Story- Aapne Kaha Tha)

सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…

July 4, 2025
© Merisaheli