Entertainment Marathi

आता ११ वर्षांनंतर अंकुश, स्वप्नील आणि सई पुन्हा एकदा एकत्र (After 11 Years Ankush Chaudhari, Sai Tamhankar, Swapnil Joshi Come Together For A Movie)

जवळपास ११ वर्षांपूर्वी संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यातील कलाकार, त्यांचा दमदार अभिनय, ओठांवर रुळणारी गाणी आणि कथा हे सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. यामध्ये अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, उर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी यांसह इतरही कलाकारांच्या भूमिका होत्या. आता ११ वर्षांनंतर अंकुश, स्वप्नील आणि सई पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यांच्यासोबत संजय जाधवही आहेत. मनात टिक टिक वाजवणारी आणि धडधड वाढवणारी ही टीम आता प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे. ए. व्ही. के. पिक्चर्स, व्हिडीओ पॅलेस आणि मेटाडोर प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यातच आहे.

या नव्या चित्रपटाची पूर्वतयारी सुरू झाली असून ही टीम प्रेक्षकांना ११ वर्षांनंतर भेटीस येणार आहे. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर याचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत. या चित्रपटाबाबत अमेय खोपकर म्हणाले, “संजय जाधव यांच्यासारख्या धमाकेदार दिग्दर्शकांसोबत ‘येरे येरे पैसा’, ‘येरे येरे पैसा 3’, ‘कलावती’ हे यशस्वी चित्रपट केल्यानंतर आता हा नवाकोरा चित्रपट करायला मिळतो आहे. अंकुश, सई, स्वप्नील यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला आहे.”

सई, स्वप्निल आणि अंकुश या त्रिकुटाला एकत्र पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचं नाव काय असेल आणि त्यात इतर कोणते कलाकार भूमिका साकारणार आहेत, याविषयी माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सई, अंकुश आणि स्वप्निलचं हे त्रिकुट मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा कमाल करणार, हे मात्र नक्की! दिग्दर्शक संजय जाधव यांनी आजवर दमदार चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. यात ‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘खारी बिस्कीट’, ‘येरे येरे पैसा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

व्यंग्य- आप कुछ समझते क्यों नहीं? (Satire- Aap Kuch Samjhte Kyon Nahi?)

बॉस थक जाते हैं, कहते है, “यार ये कुछ समझाता क्यों नहीं."और मुझे लगता है,…

July 22, 2024

श्रावण मास पर विशेष: कहानी- हम में शक्ति हम में शिव… (Short Story- Hum Mein Shakti Hum Mein Shiv…)

तभी मां जो शिव की अनन्य भक्त थीं, बोलीं, ''बेटा! जहां ईश्वर हों, वहां आस्था…

July 22, 2024
© Merisaheli