Marathi

श्रीरामाच्या दर्शनानंतर बिग बी जलसा बंगल्यावर करतायत शंकराची पुजा, शेअर केले फोटो (After Seeking Blessings At Ram Mandir In Ayodhya, Big B Is Seen Offering Morning Prayers To Bholenath At Jalsa)

बिग बी अमिताभ बच्चन हे वयाच्या या टप्प्यातही बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे लाखो चाहते आहेत, जे त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेऊ इच्छितात. बिग बी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात, रोजचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असतात. दरम्यान, बिग बींनी त्यांच्या जलसा बंगल्यातून पूजा करतानाची छायाचित्रे शेअर केली आहेत ज्यामध्ये ते भोलेनाथच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसत आहेत.

अलीकडेच, अमिताभ बच्चन पुन्हा रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत गेले होते. तिथे त्यांनी भगवान श्री रामाची विधिवत पूजा केली. तिथून फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले होते, “जय श्री राम, आस्थाने पुन्हा बोलावलं आणि आम्ही तिथे खेचले गेलो.”

श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर आता बिग बी त्यांच्या बंगल्यात पुजा करताना दिसले, ज्याची एक झलक त्यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी X वर जलसाच्या आत असलेल्या भोलेनाथ मंदिराचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते भगवान शंकराला दूध अर्पण करताना दिसत आहेत. याशिवाय दोन फोटोंध्ये ते तुळशीला जल अर्पण करताना दिसत आहे. ही छायाचित्रे शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “विश्वास…भगवान शिवाला दूध अर्पण करणे आणि तुळशीला जल अर्पण करणे.”

बिग बींना देवाच्या भक्तीत रमलेले पाहून त्यांचे काही चाहते आनंदी आहेत आणि कमेंट करून त्यांची स्तुती करत आहेत, तर काही लोक त्यांना एका खास कारणावरून ट्रोलही करत आहेत. वास्तविक, बिग बींनी उजव्या हाताने भोलेनाथला दूध अर्पण केले, मात्र ते डाव्या हाताने तुळशीला जल अर्पण करत आहेत. युजर्सच्या हे लक्षात येताच त्यांनी बिग बींना ट्रोल करण्यास सुरुवात केली

दरम्यान, बातमी येत आहे की, बहुचर्चित चित्रपट रामायण मध्ये अमिताभ बच्चन राजा दशरथची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी वृत्तानुसार निर्मात्यांनी बिग बी यांच्याशी संपर्क साधला आहे.

Akanksha Talekar

Recent Posts

अभिनेते फिरोज खान यांच्या निधनामुळे शोककळा (Actor Firoz Khan Known For Imitating Amitabh Bachchan Dies Of Heart Attack)

'भाभीजी घर पर है' फेम अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसणारे अभिनेते फिरोज खान यांचे निधन झाले…

May 24, 2024

समझें कुकिंग की भाषा (Cooking Vocabulary: From Blanching, Garnishing To Marination, Learn Cooking Langauge For Easy Cooking)

प्यूरी बनना, बैटर तैयार करना, ग्रीस करना... ये सब रेसिपी के कुछ ऐसे शब्द हैं,…

May 24, 2024

कहानी- एक आदर्श (Short Story- Ek Adarsh)

धीरे-धीरे मेरे नाम से अच्छी के स्थान पर 'आदर्श' शब्द जुड़ गया.ये नाम मुझसे छीन…

May 24, 2024
© Merisaheli