Entertainment Marathi

आराध्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अभिषेक बच्चनची अनुपस्थिती (Aishwarya Rai Celebrates Aaradhya Bachchans 13th Birthday Abhishek Bachchan Is Missing)

ऐश्वर्या रायने लेक आराध्याच्या तेराव्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. परंतु या फोटोंमध्ये अभिषेक बच्चन कुठेच दिसत नसल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. लेकीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये अनुपस्थिती असल्याने पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या मनात अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यातील नात्याबद्दल पाल चुकचुकली आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिच्या कुटुंबासाठी नोव्हेंबर महिना खूप खास असतो. या महिन्याच्या पहिल्याच तारखेला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी तिची मुलगी आराध्याचा वाढदिवस साजरा केला जातो. यावर्षी आराध्या १३ वर्षांची झाली आहे. तर २१ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांचा जन्मदिवस असतो. या सर्वच दिवसांचं निमित्त साधत ऐश्वर्याने बुधवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले. मुलगी आराध्याचा वाढदिवस आणि वडील कृष्णराज राय यांचा जन्मदिवस साजरा करतानाचे हे फोटो आहेत. मात्र या फोटोंमध्ये ऐश्वर्याचे पती आणि आराध्याचे वडील अभिषेक बच्चन कुठेच दिसत नाही. यावरून नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली.

यातील एका फोटोमध्ये आराध्या तिच्या आजोबांच्या फोटोसमोर डोकं ठेवल्याचं पहायला मिळतंय. तर दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्यासुद्धा तिच्या वडिलांच्या फोटोसमोर डोळे मिटून उभी आहे. तिसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या कृष्णराज राय यांच्या फोटोसमोर उभ्या असल्याचं पहायला मिळतंय. एका फोटोत ऐश्वर्याची आईसुद्धा दिसतेय. तर पुढील काही फोटो आराध्याच्या लहानपणीचे आहेत. यातील शेवटचा फोटो आराध्याच्या बर्थडे पार्टीचा आहे. आराध्या आता अधिकृतरित्या किशोरवयीन झाली आहे.

‘माझ्या आयुष्यातील सर्वांत प्रिय बाबा-अज्जा आणि माझी प्रिय आराध्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं हृदय.. माझा आत्मा.. सदैव आणि त्याही पलीकडे..’, असं कॅप्शन ऐश्वर्याने या फोटोंना दिलं आहे. ऐश्वर्याच्या या फोटोंवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पण त्याचसोबत अभिषेक बच्चन या सेलिब्रेशनमध्ये का सहभागी नाही, असा सवालही नेटकऱ्यांनी केला आहे. पण या फोटोंमध्ये ऐश्वर्याच्या हातात लग्नाची अंगठी मात्र दिसून येत असल्याचं काही चाहत्यांनी निदर्शनास आणलं.

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. त्यावर अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ऐश्वर्याच्या वाढदिवशीही अभिषेक आणि बच्चन कुटुंबीयांकडून सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट लिहिण्यात आली नव्हती. या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. या दोघांनी ‘दसवी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यात जेव्हा दोघं वेगवेगळे आले, तेव्हा घटस्फोटाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. या लग्नात अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत आला होता, तर ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या या दोघीच नंतर आल्या होत्या.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

डायमंड ज्युबिली (Short Story: Diamond Jubilee)

अहो, मी आता 75 वर्षांची झाले, कित्ती मोठ्ठा इव्हेन्ट आहे हा, शिवाय85 वर्षांचे तुम्ही… माझ्या…

November 21, 2024

Get, Set, Prep!

To look and be at your best on your wedding day requires intensive and organized…

November 21, 2024

डेंगू से बचाव के लिए चमत्कारी १७ घरेलू उपाय (17 Effective Home Remedies for Dengue)

* डेंगू में खून में प्लेटलेट्स बहुत कम हो जाता है, बॉडी में प्लेटलेट्स को…

November 20, 2024

कहानी- गृहिणी (Short Story- Grihinee)

"… मैं नहीं कहती कि शोभा या रंजिता भाभी घर से बाहर मौज-मस्ती करने जाती…

November 20, 2024

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने भाड्याने दिलं आपलं आलिशान घर, एका महिन्याचं भाडं ऐकून व्हाल थक्क (Ranveer Singh And Deepika Padukone Rental Apartment In Prabhadevi 3 Years For 7 Lakh Rupees Per Month)

बॉलीवूडमधील बेस्ट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या कामाचे…

November 20, 2024
© Merisaheli