Marathi

नाटककार रत्नाकर मतकरी यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडी चित्रपटाच्या स्वरुपात झळकणार (Albatya Galbatya Marathi Natak In 3d Film)

नाटककार रत्नाकर मतकरी यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. सत्तरच्या दशकात या बालनाट्याने रंगभूमी गाजवली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या नाटकात चिंची चेटकिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर झी प्रस्तुत आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या गलबत्या’ पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं. यावेळी अभिनेते वैभव मांगले यांनी चिंची चेटकिण साकारली. आता अलबत्या गलबत्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच थ्रीडी स्वरुपात रुपेरी पडद्यावर ‘अलबत्या गलबत्या’ पाहायला मिळणार आहे.

लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर या नाटकावरून चित्रपट बनवण्याचे हे शिवधनुष्य पेलणार आहेत. या चित्रपटात अभिनेते वैभव मांगले मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत. पुढील वर्षी १ मे २०२५ ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या टीझरनेच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आता या चित्रपटासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत.

तरुण लेखक दिग्दर्शक वरूणनं आतापर्यंत चित्रपट, वेब सीरिज केल्या आहेत. त्यात ‘मुरांबा’, ‘दो गुब्बारे’, ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, त्यानं दिग्दर्शित केलेल्या अनेक जाहिरातीही गाजल्या आहेत. आता ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाला तंत्रज्ञानाची जोड देऊन, नव्या रुपात चित्रपट माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात येणार आहे. या चित्रपटला अत्याधुनिक व्हीएफेक्सची जोड दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट थ्रीडी मध्ये असल्यामुळे बच्चेकंपनीला एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे.

‘अलबत्या गलबत्या’ या चित्रपटाची निर्मिती ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’चे संजय छाब्रिया, ‘उदाहरणार्थ निर्मित’चे सुधीर कोलते आणि ‘न्यूक्लिअर ॲरो’चे ओंकार सुषमा माने करत आहेत. ‘भालजी पेंढारकर चित्र’ हे या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. रत्नाकर मतकरी यांनी कथा, कादंबरी, नाटक असे विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यांची अनेक नाटकं मराठी प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. त्याशिवाय त्यांनी बालरंगभूमीवरही अनेक यशस्वी प्रयोग केले होते. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटकही त्यापैकीच एक… या बालनाट्यानं इतिहास घडवला.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

व्यंग्य- आप कुछ समझते क्यों नहीं? (Satire- Aap Kuch Samjhte Kyon Nahi?)

बॉस थक जाते हैं, कहते है, “यार ये कुछ समझाता क्यों नहीं."और मुझे लगता है,…

July 22, 2024

श्रावण मास पर विशेष: कहानी- हम में शक्ति हम में शिव… (Short Story- Hum Mein Shakti Hum Mein Shiv…)

तभी मां जो शिव की अनन्य भक्त थीं, बोलीं, ''बेटा! जहां ईश्वर हों, वहां आस्था…

July 22, 2024
© Merisaheli