Uncategorized

अंगद बेदीच्या वडीलांच्या निधनानंतर सलमान खानने त्याचे फोनवर २० मिनिटे केलेले सांत्वन, अभिनेत्यानेच सांगितला किस्सा (Angad Bedi Says Salman Khan Spoke To Him For 20 Minutes After His Dad Bishan Singh Bedi’s Death)

काही दिवसांपूर्वी अभिनेता अंगद बेदीचे वडील आणि क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर अंगद बेदीने आता खुलासा केला आहे की त्यांचे वडील आणि महान क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांच्या निधनानंतर सलमान खानने त्याला फोन करून त्याच्याशी सुमारे 20 मिनिटे चर्चा केली होती.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि अंगद बेदी यांनी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघेही इंडस्ट्रीत एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत आणि त्यांच्यात खूप खोल बॉन्डिंग आहे.

न्यूज 18 ला दिलेल्या आपल्या ताज्या मुलाखतीत सलमान खानबद्दल खुलासा करताना अभिनेता अंगद बेदी म्हणाला – बिशन सिंह बेदी यांच्या निधनानंतर सलमान भाईने एक मेसेज केला होता, या मेसेजमध्ये मी तुमच्यासाठी एक ट्विट केले आहे असे लिहिले होते. हे ट्विट वाचा. मला आशा आहे की ट्विट वाचल्यानंतर तुम्हाला समजेल.

अंगदने पुढे सांगितले की, ट्विटनंतर सलमान भाईने मला कॉल केला आणि माझ्याशी 20 मिनिटे संवाद साधला. संवादादरम्यान, मी भाईजानला असेही सांगितले की मी तुम्हाला सोशल मीडियावर उत्तर देईन. कारण त्याचा संदर्भ मला माहीत होता. आमच्यात खूप गोड आणि सुंदर बंध आहे. जो मी सलमान भाई आणि त्यांच्या कुटुंबासोबत शेअर करतो.

सलमान भाईने नेहमीच माझी काळजी घेतली आहे. मी नेहमी माझ्या आयुष्यात त्याच्या उपस्थितीचे कौतुक करतो आणि त्याचा आदर करतो. महान क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांच्या निधनानंतर सलमान खानने त्यांना श्रद्धांजली वाहणारी एक नोट सोशल मीडियावर शेअर केली होती.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षाः मेट्रो… इन दिनों- रिश्ते और प्यार से जूझती रोमांटिक म्यूज़िकल जर्नी… (Movie Review: Metro… In Dino)

रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…

July 4, 2025

पहला अफेयर- तीन दिवसीय प्यार! (Love Story- Teen Divasiy Pyar)

वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…

July 4, 2025

कहानी- आपने कहा था (Short Story- Aapne Kaha Tha)

सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…

July 4, 2025
© Merisaheli