Marathi

‘फायटर’ चित्रपटातील ‘ग्रूप कॅप्टन राकेश जय सिंग’च्या भूमिकेतील अनिल कपूर यांचा फर्स्ट लूक रिलीज! (Anil Kapoor’s first look from Fighter released)

‘फायटर’ चित्रपटातील, ‘ग्रूप कॅप्टन राकेश जय सिंग’च्या भूमिकेतील अनिल कपूरच्या लूकची झलक समोर आली आहे.

२०२४ च्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘फायटर’बाबतची चाहत्यांची उत्सुकता सतत वाढत आहे. ही उत्सुकता दुप्पट वेगाने वाढवण्यासाठी, या चित्रपटातील अनिल कपूरच्या खास लूकची झलक सिनेरसिकांसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे.

या चित्रपटात अनिल कपूर ग्रूप कॅप्टन राकेश जय सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे, जे कामासाठी त्याच्या वापरण्यात येणाऱ्या ‘रॉकी’ या नावाने ओळखले जात असतात.

‘फायटर’ मधील कमांडिंग ऑफिसरच्या भूमिकेतील अनिल कपूरची व्यक्तिरेखा गहिरेपण आणि गांभीर्याचा मिलाफ आहे. प्रामाणिकपणा, सामर्थ्य, त्याग आणि वचनबद्धता एकवटलेल्या या व्यक्तिरेखेत अनिल कपूर यांनी जणू प्राण फुंकले आहेत.

‘रॉकी’च्या भूमिकेतील त्याचे रूपांतरण नेतृत्व म्हणजे काय, याचा अर्थ सांगते. ‘फायटर’ चे भावविश्व उत्तम प्रकारे साकारते आणि प्रेक्षकांना एक रंजक सिनेमॅटिक अनुभव मिळण्याची हमी देते.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि वायाकॉम१८ स्टुडियो आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पेश होत असलेला ‘फायटर’ हा एक सिनेमॅटिक अनुभव आहे, जो साहसी कथाकथनात क्रांती घडवून आणेल.

हा चित्रपट हृदयस्पर्शी साहसी सीनमध्ये सहज-सुंदररीत्या देशभक्तीचा सळसळता उत्साह पेरतो, ज्यामुळे हा चित्रपट पाहताना जगभरातील प्रेक्षकांना एक तल्लीन करणारा अनुभव मिळेल, आणि अर्थातच चित्रपट सर्वांच्या पसंतीला उतरेल.

म्हणूनच ‘फायटर’ चित्रपटाच्या टेक-ऑफचा अनुभव घेण्यासाठी, २५ जानेवारी २०२४ या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनाची, तुमच्या कॅलेंडरवर नक्की नोंद करा. साहस व देशभक्तीचे स्फुल्लिंग मनामनांत चेतवण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

७ अजब-गज़ब बातें (7 Unusual Facts That Surprise You)

हमारे देश में एक ऐसा गांव है जहां पर सीटी बजाकर बुलाया जाता है. जी…

April 10, 2025

गौहर खान दुसऱ्यांदा आई होणार : पती जैदसोबत नाचताना बेबी बंपचे केले प्रदर्शन (Gauahar Khan And Zaid Darbar Announce Second Pregnancy)

अभिनेत्री गौहर खानने तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर पती जैद दरबारसोबतचा…

April 10, 2025
© Merisaheli