Marathi

अनाथ अर्शद वारसीने ट्रेन मध्ये विकलेली सौंदर्य प्रसाधने, अशी मिळली बॉलीवूड मध्ये एंट्री ( Arshad Warsi saled cosmetics in the train at his childhood)

अर्शद अगदी लहान वयातच अनाथ झाला होता. एकेकाळी मुंबईत जगण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. अर्शद म्हणाला, ‘आमची परिस्थिती खूपच विचित्र होती. एक काळ असा होता की मी बोर्डिंग स्कूलमध्ये जायचो आणि परत आल्यावर त्या घरातून शिफ्ट व्हायचो. मी खूप लहान होतो, साधारण १०-१२ वर्षांचा. मला कळत नव्हते की काय होतय.’

लहान वयात आई-वडील गेले
अभिनेता म्हणाला, ‘घर बदलल्यावर मला नेहमी सांगितलं जायचं की तिथे काही नूतनीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे आपण काही दिवस इथे राहू आणि नंतर परत जाऊ. मी बोर्डिंग स्कुलमधून जेव्हा जेव्हा घरी जायचो तेव्हा तेव्हा दरवेळी घर बदलले असायचे आणि ते पूर्वीपेक्षा छोटे असायचे. मी १६-१७ वर्षांचा असताना माझ्या आई-वडिलांचे निधन झाले. आई-वडिलांच्या निधनानंतर तो आपला अभ्यास सोडून उदरनिर्वाहासाठी ट्रेन आणि बसमध्ये सौंदर्य प्रसाधने विकायचा.
नंतर अर्शदने नृत्यदिग्दर्शनात नशीब आजमावले पण नशिबाने त्याला अभिनयाच्या दुनियेत आणले होते, पण दुर्देवाने त्याचे सलग ८ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. त्यामुळे अभिनेता तीन वर्षे बेरोजगार होता. पुढे २००३ मध्ये आलेल्या मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमातल्या सर्किट या भूमिकेमुळे अर्शदचे नशीब पालटले.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

वडील इरफान खान यांच्या पुण्यतिथी आधीच बाबिल खान ची भावूक पोस्ट (Sometimes I feel like giving up and going to Baba- Babil Khan emotional before Papa Irrfan Khan’s death anniversary)

दिवंगत अभिनेता इरफान खान याला जग सोडून बरीच वर्षे झाली असतील, पण त्याच्या आठवणी आजही…

April 25, 2024

पैर हिलाना अपशकुन नहीं, इस बीमारी का संकेत (Leg Shaking Habit Is Good Or Bad)

आपने अक्सर देखा होगा कि कुछ लोगों को पैर हिलाने की आदत सी होती है.…

April 25, 2024
© Merisaheli