भारतामध्ये, स्त्रिया वयाच्या सुमारे ४६.२ वर्षाच्या आसपास मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीच्या टप्प्यातून जातात. पाश्चात्य देशांतील ५१ वर्षांच्या सरासरी वयाच्या तुलनेत भारतीय स्त्रियांमध्ये हा टप्पा लवकर येतो. या काळामध्ये स्त्रियांनी काम व वैयक्तिक आयुष्य यांतील संतुलन साधतानाच रजोनिवृत्तीची लक्षणे समजून घेणे व त्यांना हाताळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अबॉट व इप्सोस यांनी घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये रजोनिवृत्तीचा स्त्रीच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे मत ८७ टक्के लोकांनी व्यक्त केले. हॉट फ्लशेस, घामाघूम होणे, झोप न लागणे, मूड्स बदलत राहणे आणि सांधे दुखणे यांसारखी लक्षणे हाताळायला कठीण वाटू शकतात. तरीही या प्रश्नाविषयी कुटुंबीयांशी, मित्रमंडळींशी, सहकाऱ्यांशी बोलणे अवघड वाटत असल्याचे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळ-जवळ ८० टक्के महिलांनी सांगितले. या सर्वेक्षणामध्ये सात शहरांतील १२०० हून अधिक लोकांचे विचार नोंदवून घेण्यात आले. या विषयाबद्दल स्त्रियांमध्ये कितपत जागरुकता आहे, त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे व रजोनिवृत्तीदरम्यान त्या कोणत्या अनुभवांतून जातात याचा अंदाज घेणे हा या सर्वेक्षणाचा हेतू होता. या सर्वेक्षणामध्ये ४५-५५ वर्षे वयोगटातील स्त्रिया तसेच कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता.
रजोनिवृत्तीच्या लक्षणांमुळे नोकरीवरील आयुष्य आव्हानात्मक बनू शकते. सर्वेक्षणानुसार नोकरी करणाऱ्या स्त्रियांपैकी ८० टक्के स्त्रियांना एकाग्रता साधणे कठीण जाते, ७३ टक्के स्त्रियाना वारंवार रजा घ्यावी लागते व ६६ टक्के स्त्रियांना मनोवस्थेत मोठे चढउतार जाणवतात (मूड स्विंग्ज) आणि चिडचिडेपणा होतो असे दिसून आले. या समस्यांमुळे त्यांच्या उत्पादकतेवर, कामातून मिळणाऱ्या समाधानावर आणि करिअरमधील प्रगतीवर परिणाम होऊ शकतो.
अबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स हेड डॉ. रोहिता शेट्टी सांगतात, “रजोनिवृत्तीविषयी जागरुकता वाढविण्याचे काम हे केवळ काही तथ्यांची माहिती करून देण्यापुरते मर्यादित नसते. इथे स्त्रियांना आपला अनुभव सांगताना अवघडलेपणा वाटणार नाही असा एक अवकाश त्यांच्यासाठी निर्माण करणे गरजेचे असते. विमेन फर्स्ट ही वेबसाइट हा असाच एक मंच आहे, जो उपयुक्त माहिती पुरवितो व कुटुंबीय, मित्रपरिवार व सहकाऱ्यांशी खुल्या, अर्थपूर्ण संवादाला प्रोत्साहन देतो. या आधारामुळे स्त्रिया आपल्या आयुष्यातील पुढचा टप्पा आत्मविश्वासाने व सहजतेने स्वीकारण्यास सक्षम बनतात.”
शिंदे मेडिकेअर हॉस्पिटल, मुंबईच्या संचालक डॉ. वीणा शिंदे यांच्या मते, “रजोनिवृत्ती हा प्रत्येक स्त्रीसाठी एक आगळावेगळा अनुभव असतो, ज्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर, स्वास्थ्यावर आणि एकूणच जीवनमानाच्या दर्जावर होतो. सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे बदलाचा हा टप्पा सुलभतेने आणि अधिक आरामदायीपणे पार करता येऊ शकतो. नोकरदार महिलांसाठी ध्यानधारणेसाठी छोटासा ब्रेक घेणे, कितीही व्यग्र दिनक्रम असला तरीही संतुलित आहार घेणे आणि नियमित व्यायामासाठी आवर्जून वेळ काढणे अत्यावश्यक आहे. डॉक्टरांशी उपचारांच्या पर्यायांविषयी चर्चा करणेही महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे तुमच्या जीवनमानाच्या दर्जावर परिणाम करणाऱ्या लक्षणांना दूर करण्यामध्ये मदत होऊ शकते.”
रजोनिवृत्तीची लक्षणे अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी व आपल्या आरोग्याची तसेच आपल्या करिअरची सूत्रे आपल्या हातात घेण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे:
रजोनिवृत्ती हा तुमच्या आयुष्यातील केवळ एक पुढचे प्रकरण आहे, आयुष्य संपूर्णपणे जगण्यातला अडसर नव्हे. तुम्ही काही समस्यांना सामोऱ्या जात असाल तर आपल्या डॉक्टरांशी बोला आणि योग्य ती देखभाल मिळवा. योग्य पाठबळाच्या साथीने तुम्ही नेहमीप्रमाणेच भरभरून जगू शकता आणि आपल्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करू शकता.
बीते कल एक्ट्रेस उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) का एक बयान सोशल मीडिया पर सनसनी फैला…
जाह्नवी कपूर (Jhanhvi kapoor) उन एक्ट्रेसेज में से एक हैं, जो सामाजिक मुद्दों (Social Issues)…
अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, इरफान खान स्टारर फिल्म ‘पीकू’ साल 2015 में आई थी. पिता-पुत्री…
सुष्मिता सेन (Sushmita Sen) की भाभी चारु असोपा (Charu Asopa) पिछले काफी समय से अपनी…
एक पॉडकास्ट को दिए इंटरव्यू में उर्वशी रौतेला (urvashi Rautela) ने इस बात का दावा…
"हमेशा अपने बच्चों की मां बनकर जीने के अलावा नारी को कभी-कभी अपने पति की…