Marathi

प्रीती झिंटाचं ६ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन (Bollywood Actress Preity Zinta To Comeback With Sunny Deol In Lahore 1947)

बॉलिवूडमधील डिंपल गर्ल अन्‌ IPL मध्ये पंजाब किंग्ज संघाची मालकीण प्रिती झिंटा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून काहीशी दूरच आहे. पण प्रितीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रिती तब्बल ६ वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतेय.

प्रिती झिंटा आगामी ‘लाहोर 1947’ या चित्रपटात झळकणार आहे. आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत हा एक पीरियड ड्रामा चित्रपट असेल. या चित्रपटात प्रितीसोबत अभिनेता सनी देओल प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय राजकुमार संतोषी या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून अनेक वर्षांनी संतोषी आणि आमिर खान एकत्र काम करत आहेत.

काल २४ जानेवारी रोजी प्रीती झिंटा मुंबईतील एका स्टुडिओतून बाहेर पडताना दिसली. सूत्रांच्या माहितीनुसार प्रिती ‘लाहोर 1947’ च्या लुक टेस्टसाठी स्टुडिओमध्ये पोहोचली होती. प्रीती या चित्रपटाद्वारे अनेक वर्षांनी सनी देओलसोबत पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सनी आणि प्रीती यांनी ‘हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘फर्ज’ आणि ‘भैयाजी सुपरहिट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांनी ९० च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. यामध्ये घायल, दामिनी, घातक यांसारखे हिट सिनेमांचा समावेश आहे. ‘गदर 2’ नंतर सनी देओल ‘लाहोर 1947′ सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून आमिर खान आणि संतोषी हे ”अंदाज अपना अपना’ नंतर एकत्र काम करणार आहेत.

आता प्रिती – सनी – आमिर खान यांच्या ‘लाहोर 1947’ ची उत्सुकता शिगेला आहे. हा सिनेमा २०२५ ला भेटीला येण्याची शक्यता आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

‘डर्टी पिक्चर’नंतर विद्या बालनला लागले होते धूम्रपानाचे व्यसन; अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा (Vidya Balan Got Addicted To Smoking After The Dirty Picture)

विद्या बालन ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्याने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे…

April 26, 2024

पसंती (Short Story: Pasanti)

सुधीर सेवेकरत्याने अभ्यासपूर्वक जाणीवपूर्वक पोलंड देशाची, त्याच्या निवासासाठी, कामासाठी निवड केलीय. त्याला आता काही वर्षे…

April 26, 2024

काश मी माझ्या बाबांचा शेवटचा फोन उचला असता… रिध्दीमा कपूरने व्यक्त केली खंत (Riddhima Kapoor gets emotional remembering her father Rishi kapoor)

30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांना या जगाचा निरोप घेऊन चार वर्षे पूर्ण होत आहेत.…

April 26, 2024

कहानी- तुम्हें कुछ नहीं पता (Short Story- Tumhe Kuch Nahi Pata)

"शार्प माइंड है. अपनी उम्र के बच्चों से कहीं ज़्यादा जानकार है, लेकिन मेरे लिए…

April 26, 2024
© Merisaheli