पृथ्वीतलावर जगत असताना काय चांगलं आणि काय वाईट ही समजूत कोवळ्या वयात जर मुलांच्या अंगी आली, तर माणसाची माणुसकी पृथ्वीवर कायम टिकून राहिल. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म आणि बाल दिवसाचं औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२३ रोजी लहान मुलांना माणूसपण शिकवणारा हॉलिवूडचा अॅनिमेटेड चित्रपट ‘बर्फाची राणी’ अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे.
चित्रपटाची कथा एका मोठ्या राज्यातील राजा, जादूगर आणि बर्फात बंदिस्त झालेली शापित राणी यांच्या भोवती फिरते. गेर्डा ही एका सामान्य जादूगाराच्या घरात जन्मलेली असामान्य मुलगी आहे, जिला तूर्तास तिच्यात असणाऱ्या जादुई कौशल्याचे ज्ञान नाही. राजाने राज्यातील सर्व जादूगारांना धनाचे आमिष दाखवून बर्फाच्या राणीच्या जगात बंदिस्त केले आहे, जिथून कोणीही परत येऊ शकत नाही. त्यात गेर्डाचे आई वडील आणि भाऊही आहे. गेर्डा आपल्या कुटुंबाला सोडवण्यात यशस्वी होईल का? हे चित्रपटात कळणार आहे.
“पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ आणि बाल दिवसानिमित्त बालकांना मनोरंजनासोबतच माणूस म्हणून जगण्याची चांगली शिकवण देणारा चित्रपट ‘बर्फाची राणी’ अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे.
सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू आहे. अरबाज खान याच्यानंतर…
इन दिनों अली गोनी और जैस्मिन अपनी शादी को लेकर खूब चर्चा में हैं. अली…
टीवी इंडस्ट्री की जानी-मानी एक्ट्रेस और कॉमेडियन-एक्टर कृष्णा अभिषेक (Krishna Abhishek) की बहन आरती सिंह…
Struggling With Your Investments? Shreeprakash Sharma offers Help! Ragini realised yet another financial year was…
तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण…
बॉलीवुड कपल रिचा चड्ढा और अली फजल के घर जल्द ही किलकारी गूंजने वाली हैं.…