Marathi

सीआयडी फेम ​​फ्रेडी म्हणजेच अभिनेते दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती चिंताजनक (CID fame Freddie Actor Dinesh Phadnis suffered heart attack, his condition is critical)

लोकप्रिय टीव्ही सिरियल सीआयडीमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स उर्फ ​​फ्रेडीची भूमिका साकारुन अभिनेता दिनेश फडणीस घराघरात लोकप्रिय झाले. पण त्यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला असून त्याला मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिनेश फडणीस हे व्हेंटिलेटरवर असून जीवन-मरणाशी झुंज देत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. शुक्रवारी १ डिसेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण आता थोडी सुधारणा झाली आहे.

५७ वर्षीय अभिनेते दिनेश फडणीस सोशल मीडियावर सक्रिय असतात. तिथे ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. आता त्यांच्या हृदयविकाराच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. सीआयडी या मालिकेचे संपूर्ण कलाकार आणि क्रू या अभिनेत्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आले होते. याची माहिती त्यांना 1 डिसेंबर रोजीच देण्यात आली.

दिनेश यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी 1998 ते 2018 या काळात CID मध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारली होती. त्यांची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. या अभिनेत्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सिटकॉम शोमध्येही त्याने छोटी भूमिका केली होती. याशिवाय त्याने काही चित्रपटांमध्ये कॅमिओ देखील केला आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शिका व कोरिओग्राफर फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खानची आई मेनका इराणी यांचं निधन (Farah Khan Mother Menaka Irani Died In Mumbai)

सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शिका व कोरिओग्राफर फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खानची आई मेनका इराणी यांचं…

July 26, 2024

ब्रेकअप की अफवाहों के बीच एयरपोर्ट पर अलग- अलग स्पॉट हुए अर्जुन कपूर और मलाइका अरोड़ा (Amidst Breakup Rumours, Arjun Kapoor And Malaika Arora Seen Separately At The Airport)

मलाइका अरोड़ा और अर्जन कपूर के ब्रेकअप की अफवाहें काफी दिनों से सोशल मीडिया की…

July 26, 2024

कहानी- एक खाली पृष्ठ (Short Story- Ek Khali Prishth)

उन्हीं दिनों एक बार मैंने आटोग्राफ बुक खोल कर उनके सामने रखी. वे उस खाली…

July 26, 2024
© Merisaheli