Entertainment Marathi

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अजरामर मराठी चित्रपट ‘अमर भूपाळी’ टेलिव्हिजनवर प्रदर्शित (Classic Marathi Movie ‘Amar Bhupali’ Slated For Release On T.V.: Gudhi Padva Special Screening)

मराठी चित्रपटांच्या सुवर्ण इतिहासात अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे अमर भूपाळी. १९५१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट लवकरच ७५ वर्ष पूर्ण करणार आहे. व्ही शांताराम यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला हा चित्रपट अभिनेत्री संध्या, ललिता पवार आणि पंडीतराव नगरकर अश्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने नटलेला आहे. अमर भूपाळी सिनेमातील लता मंगेशकर, आशा भोसले आणि पंडीतराव नगरकर यांच्या आवाजातील घनश्याम सुंदरा, लटपट लटपट आणि सांगा मुकुंद कुणी हा पाहिला… ही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. ७५ वर्ष उलटून गेली तरी आजही ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. तर शाहीर होनाजी बाळा यांनी ही गाणी लिहीली होती.

मराठी चित्रपटाचा हा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी चित्रपटांच्या इतिहासात अजरामर ठरलेला अमर भूपाळी सिनेमा प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे. मराठी सिनेमांचं व्यापक रुप आपण अनुभवत असताना पुन्हा एकदा ब्लॅक ॲण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळात जाण्याची संधी प्रवाह पिक्चर वाहिनी घेऊन आली आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

‘पीकू’ की दोबारा रिलीज़ पर इमोशनल नोट के साथ दीपिका पादुकोण ने इरफान खान को याद किया… (Deepika Padukone remembers Irrfan Khan with an emotional note on the re-release of ‘Piku’…)

अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, इरफान खान स्टारर फिल्म ‘पीकू’ साल 2015 में आई थी. पिता-पुत्री…

April 19, 2025

कहानी- आसमान साफ़ है (Short Story- Aasman Saaf Hai)

"हमेशा अपने बच्चों की मां बनकर जीने के अलावा नारी को कभी-कभी अपने पति की…

April 19, 2025
© Merisaheli