Marathi

‘क्रू’चा मजेशीर टीझर रिलीज (Crew Teaser)

बॉलिवूडच्या नायिका तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आगामी क्रू या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करून त्यांनी आपल्या चित्रपटाची घोषणा केली होती. आता नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अभिनेत्री करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन स्टारर क्रू या चित्रपटचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा हे देखील दिसत आहेत. टीझरमधील डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

करीनानं क्रू या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला तिनं कॅप्शन दिलं, “कुर्सी की पेटी बांध लें, क्योंकि यहां का तापमान आपके लिए बहुत गर्म होने वाला है” टीझरमध्ये करीना, तब्बू आणि क्रिती या तिघी एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसत आहेत. फ्लाईटमध्ये या तिघींसोबत घडलेल्या घटनांची झलक टीझरमध्ये दिसत आहे. क्रू चित्रपटाचा टीझर कॉमेडी आहे. या चित्रपटाची टॅगलाईनही जोरदार आहे – “रिस्क इट, स्टिल इट, फेक इट.” या टीझरमधील कॉमेडी सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

करीना, क्रिती आणि तब्बू यांचा हा चित्रपट २९ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश के कृष्णन यांनी केले आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. एकता कपूर आणि रिया या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. क्रू या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून चित्रपटाच्या कथेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

एकता कपूर आणि रिया क्रू या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. त्यापूर्वी त्यांचा ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता क्रू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- पराजय (Short Story- Parajay)

तब वह अपने पति के भटके कदमों को‌ बांधने में सफल हुई थी. पर उसके…

July 10, 2025

बधाई हो: राजकुमार राव-पत्रलेखा ने दी पैरेंट्स बनने की ख़ुशख़बरी (Congratulations: Rajkumar Rao-Patralekha gave the good news of becoming parents)

राजकुमार राव ऐसे अभिनेता हैं, जो हर भूमिका को बख़ूबी निभाते हैं, फिर चाहे अभिनेता…

July 9, 2025
© Merisaheli