आहारशास्त्रातील औषधी गुणधर्माची, बहुगुणी अशी पांढर्या, हिरव्या व पिवळसर वर्णाची काकडी ही फळभाजी आयुर्वेदिकदृष्ट्या औषधी असून, तिच्यात भरपूर गुणधर्म आहेत. काकडी खाल्ल्याने शरीरात उत्साह निर्माण होतो.
उन्हाळ्यात थंडावा देणारी काकडी बहुतांशी सगळ्यांनाच आवडते. त्यात कॅलरीज अगदी कमी, फॅट किंवा कोलेस्टेरॉल अजिबात नसतं. शिवाय पुरेसा चोथा असलेली काकडी आतड्यातील विषारी द्रव्यं बाहेर काढायला मदत करते आणि वजनही आटोक्यात ठेवते. काकडीमध्ये ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असून शरीराला आवश्यक अशा प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियमची मात्रा असते. काकडीतील ’के’ जीवनसत्त्व हाडांच्या बळकटीसाठी उपयोगी आहे.
थंडगार काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते. त्वचेचा रंग उजळण्यासाठी काकडीच्या रसाचा उपयोग करतात. काकडीचा रस उन्हाळ्यातील एक आरोग्यदायी पेय आहे.
आहारशास्त्रातील औषधी गुणधर्माची, बहुगुणी अशी पांढर्या, हिरव्या व पिवळसर वर्णाची काकडी ही फळभाजी संपूर्ण भारत देशात लोकप्रिय असून, ती सर्वत्र पिकते. काकडी खाल्ल्याने शरीरात उत्साह निर्माण होतो. काकडी ही आयुर्वेदिकदृष्ट्या औषधी असून तिच्यात भरपूर गुणधर्म आहेत.
भरपूर पोषणद्रव्यं
आयुर्वेदिकदृष्ट्या काकडी ही शीतल, पित्तनाशक, पाचक आणि मूत्रल आहे. काकडीचे बी शीतल, मूत्रल, पुष्टीकारक आहे. काकडीच्या या गुणधर्मामुळे ती खाल्ली असता शरीरातील अंतर्गत स्राव व मूत्र यांचे प्रमाण वाढते आणि पर्यायाने मूत्रविकार दूर होतात.
काकडीत विपुल प्रमाणात खनिजं आहेत. अनेक जण काकडीची साल काढून काकडी खातात; परंतु शक्यतो साल काढू नये. कारण काकडीच्या सालीलगतच क्षार व जीवनसत्त्वं यांचं प्रमाण भरपूर असतं. काकडीमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशियम, मीठ, मॅग्नेशियम, गंधक, सिलिकॉन, ग्लोरीन, बम्लोरीन आणि तंतुमय पदार्थ ही पोषणद्रव्यं मिळतात.
सहसा काकडी कच्चीच खावी, कारण कच्ची काकडी ही पौष्टिक आणि पचण्यास हलकी असते.
फायदे
* काकडी ही पित्तशामक असल्याने अपचन, उलटी, मळमळ, या विकारांवर काकडीचा नियमित जेवणात वापर करावा.
* भूक मंद झाली असेल, तर काकडीचे काप करून पुदिना, काळं मीठ, लिंबू रस, मिरे व जिरेपूड घालून खावेत. यामुळे भूक चांगली लागते.
* चेहर्याचा टवटवीतपणा आणि सौंदर्य वाढवण्यासाठी काकडीचा रस आणि मध यांचं मिश्रण चेहर्यास हलक्या हाताने चोळून लावावं.
* निद्रानाश ही समस्या भेडसावत असेल, तर काकडीचे काप डोक्यावर ठेवून झोपावं.
* शरीरावरील भाजलेल्या जखमेची आग होत असेल तर काकडीचा रस लावावा, यामुळे तेथील आग थांबते.
* मधुमेह असणार्या व्यक्तींच्या हातापायांची अनेक वेळा जळजळ होत असते, अशा वेळी काकडीचे काप तळहातावर आणि तळपायावर चोळावेत.
* काकडी ही शीतल व सारक आहे. त्यामुळे मलावष्टंभाची तक्रार असणार्या रुग्णांनी रोज काकडीचं सेवन करावं. यामुळे आतड्यातील मळ पुढे ढकलण्यास मदत होते व पोट साफ होतं.
* अपचन होऊन उलट्या होत असतील तर काकडीची बी वाटून ताकामधून घ्यावी. यामुळे पित्त, दाह, वारंवार तहान लागणं हे विकार कमी होतात.
* काकडी, गाजर, बीट व कोथिंबीर यांचा रस एकत्र करून प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होते व उत्साह निर्माण होतो. तसंच शरीरात युरिक अॅसिड साठून होणारे गाऊट, आर्थरायटिस व सांधेदुखी यांसारखे रोग दूर होतात.
* आम्लपित्त, गॅसेस व आंत्रव्रण (अल्सर) यांसारखे विकार असल्यास काकडीचा कीस किंवा काकडीचा रस दर 2-4 तासांनी प्यावा. यामुळे पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.
* लघवी होताना जळजळ होत असेल तर काकडीरस लिंबूरस, जिरेपूड व खडीसाखर घालून प्यावा. यामुळे लघवीची जळजळ दूर होते.
* काकडीचा कीस चेहरा, मान यावर नियमितपणे लावल्यास चेहर्यावरील मुरुमं, पुटकुळ्या, सुरकुत्या दूर होऊन चेहरा कांतिमान होतो. तसंच हा रस केसांना लावल्यास त्यामध्ये असणार्या सिलिकॉन व गंधकामुळे केस गळायचे थांबतात.
या उन्हाळ्यात काकडी वेगवेगळ्या स्वरूपात खाण्यासाठी या काही रेसिपीज-
काकडी स्मूदी
साहित्य : 2 वाट्या काकडीच्या फोडी, 8-9 काजू, 1 वाटी सायीचं दही, मूठभर कोथिंबीर, 1 चमचा आल्याचा कीस, 1 लहान हिरव्या मिरचीचा तुकडा (हवा असल्यास), 4 पुदिन्याची पानं, अर्धा चमचा जिरं, चवीला मीठ, साखर.
कृती : सर्व जिन्नस मिक्सरमध्ये घालून पेस्ट करावी आणि थंड करून प्यायला द्यावी.
खमंग काकडी
साहित्य : पाव किलो काकड्या, 1-2 हिरव्या मिरच्या, चवीला मीठ व साखर, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, 1 मोठा चमचा लिंबाचा रस, थोडी कोथिंबीर.
फोडणीसाठी : 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, हिंग.
कृती : काकड्या सोलून, बारीक चिरा. थोडं मीठ लावून 5-10 मिनिटं ठेवा आणि पिळून त्याचं पाणी (हे पाणी ताकात घालून प्यायला छान लागते) काढून ठेवा. तुपाची हिंग, जिरं घालून फोडणी करा. काकडी, मीठ, साखर, लिंबाचा रस, दाण्याचं कूट आणि फोडणी एकत्र करून कोशिंबीर कालवा. यात लिंबाच्या रसाऐवजी कैरीचा कीसही वापरता येतो.
काकडीची कोशिंबीर
साहित्य : 2 वाट्या बारीक चिरलेली काकडी, 1 वाटी ओलं खोबरं, अर्धा चमचा लाल मोहरी, 1-2 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे सायीचं दही, चवीला मीठ, साखर, पाव चमचा हिंग, कोथिंबीर.
कृती : काकडीला मीठ लावून ती पिळून घ्या. खोबरं, मिरच्या, मोहरी, दही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात मीठ, साखर, हिंग, पिळून घेतलेली काकडी आणि कोथिंबीर मिसळा.
भरली काकडी
साहित्य : 4-5 लहान कोवळ्या काकड्या, 1 मोठा चमचा ओलं खोबरं, 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीला मीठ, तिखट व साखर, 1 चमचा लिंबाचा रस.
कृती : प्रत्येक काकडी सोलून आडवी चिरून तिचे दोन भाग करा. चमच्याने मधला गर काढून घ्या. खोबरं, दाण्याचं कूट, मीठ, साखर, लिंबाचा रस एकत्र करून हे मिश्रण प्रत्येक काकडीत दाबून भरा. थोडा वेळ काकड्या फ्रीजमध्ये ठेवा. नंतर त्यांचे काप करा.
काकडीचा कायरस
साहित्य : 2 वाट्या बारीक चिरलेली काकडी, 1 मोठा चमचा चिंचेचा घट्ट कोळ, 2 मोठे चमचे बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी भाजलेल्या तिळाचं कूट, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा.
फोडणीसाठी : 1 मोठा चमचा तेल, मोहरी, हिंग, हळद, चिमूटभर मेथी पावडर.
कृती : तेलाची फोडणी करा. त्यात मिरचीचा ठेचा परतून घ्या. त्यात काकडी, चिंच, गूळ, मीठ, आणि तिळाचं कूट घालून एक-दोन मिनिटं शिजवून घ्या. हवं असल्यास त्यात थोडं लाल तिखट घाला.
काकडी कांदा कोशिंबीर
साहित्य : 2 वाट्या बारीक चिरलेली काकडी, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा, चवीला मीठ, साखर, 1 वाटी दही.
कृती : मीठ लावून काकडीचं पाणी काढा. काकडी, कांदा, आलं-मिरची ठेचा, मीठ, साखर एकत्र करून ठेवा. आयत्या वेळी दही घाला आणि कोशिंबीर सर्व्ह करा.
आहारशास्त्रातील औषधी गुणधर्माची, बहुगुणी अशी पांढर्या, हिरव्या व पिवळसर वर्णाची काकडी ही फळभाजी आयुर्वेदिकदृष्ट्या औषधी असून, तिच्यात भरपूर गुणधर्म आहेत. काकडी खाल्ल्याने शरीरात उत्साह निर्माण होतो.
उन्हाळ्यात थंडावा देणारी काकडी बहुतांशी सगळ्यांनाच आवडते. त्यात कॅलरीज अगदी कमी, फॅट किंवा कोलेस्टेरॉल अजिबात नसतं. शिवाय पुरेसा चोथा असलेली काकडी आतड्यातील विषारी द्रव्यं बाहेर काढायला मदत करते आणि वजनही आटोक्यात ठेवते. काकडीमध्ये ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असून शरीराला आवश्यक अशा प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियमची मात्रा असते. काकडीतील ’के’ जीवनसत्त्व हाडांच्या बळकटीसाठी उपयोगी आहे.
थंडगार काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते. त्वचेचा रंग उजळण्यासाठी काकडीच्या रसाचा उपयोग करतात. काकडीचा रस उन्हाळ्यातील एक आरोग्यदायी पेय आहे.
आहारशास्त्रातील औषधी गुणधर्माची, बहुगुणी अशी पांढर्या, हिरव्या व पिवळसर वर्णाची काकडी ही फळभाजी संपूर्ण भारत देशात लोकप्रिय असून, ती सर्वत्र पिकते. काकडी खाल्ल्याने शरीरात उत्साह निर्माण होतो. काकडी ही आयुर्वेदिकदृष्ट्या औषधी असून तिच्यात भरपूर गुणधर्म आहेत.
गायक राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार जेव्हापासून एका मुलीचे पालक झाले, तेव्हापासून त्यांचे…
बॉलीवुड की दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) की बड़ी लाड़ली जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अपनी प्रोफेशनल…
अभिनेते सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर स्टारर ‘नवरा माझा नवसाचा…
भिनेता समीर खांडेकर दिग्दर्शित ‘देवाक काळजी १’ या वेबसिरीजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाच्या…
सिंगर राहुल वैद्य (Rahul Vaidya) और टीवी एक्ट्रेस दिशा परमार (Disha Parmar) जब से एक…
बॉलीवुड एक्ट्रेस करीना कपूर खान आज 21 सितंबर को 44वा साल की हो गई हैं.…