Marathi

दीपिकाने दिली गुडन्यूज, दीपवीर होणार आईबाबा! (Deepika Padukone Share Her Pregnancy News)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई-बाबा होणार आहेत. या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दीपिका सप्टेंबर 2024 मध्ये आई होणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वजण या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच दीपिकाच्या पोस्टवर कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहेत.

दीपिकाने पोस्ट शेअर केली आणि हात जोडलेले व नजर काढण्याचा इमोजी शेअर केला. अलीकडेच बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मध्ये, चाहते दीपिकाचा बेबी बंप तिच्या साडीच्या लूकमध्ये दिसत असल्याबद्दल बोलत होते. तेव्हापासून दीपिकाच्या गरोदरपणाची चर्चा सुरू होती. आता दीपिकाने ही बातमी खरी असल्याचे जाहीर केले आहे. सात महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये दीपिका आणि रणवीरच्या घरात पाळणा हलणार आहे.

2018 मध्ये लग्न झाले

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नोव्हेंबर 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले. रणवीर आणि दीपिकाने इटलीतील लेक कोमो येथे विधींवत लग्न केले. लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे जोडपे पालक बनणार आहेत. दीपिका आणि रणवीर हे बी-टाऊनमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. ही जोडी ‘दीपवीर’ या नावाने ओळखली जाते.

क्रिती सॅननने सर्वप्रथम अभिनंदन केले

दीपिका पादुकोण आई होणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. आज अभिनेत्रीने पोस्ट शेअर करून या बातम्यांना दुजोरा दिला आहे. ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनंदन करण्यात अभिनेत्री क्रिती सेनन आघाडीवर होती. दीपिकाच्या पोस्टवर कमेंट करताना क्रितीने लिहिले, ‘ओएमजी, तुम्हा दोघांचे अभिनंदन.’ मिठी मारण्याचा आणि हार्ट इमोजी देखील शेअर केले.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

पुन्हा एकदा शाहिद कपूरने खरेदी केली अलिशान प्रॉपर्टी, किंमत वाचून बसेल धक्का ( Shahid Kapoor buys luxury sea-view apartment in Mumbai)

शाहिद कपूर आणि पत्नी मीरा कपूर बी-टाऊनच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत आणि अनेकदा सोशल मीडिया…

May 28, 2024

ढोल-ताशांच्या गजरात ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचा दमदार प्रिमियर साजरा (Premiere Of Marathi Serial ‘Yed Lagale Premache’ Celebrated In Grandeur)

‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका कालपासून स्टार प्रवाह चॅनलवर सुरू झाली. त्याच्या प्रिमियरचा अनोखा…

May 28, 2024

कडक ऊन आणि थंडगार पन्हं (Harsh Heat And Cold Panha)

उन्हाचा दाह वाढू लागला की, काहीतरी थंड पिण्याची इच्छा होते. अशा वेळी उन्हाळ्यातील दाह कमी…

May 28, 2024

रुग्णालयात राखीवर हल्ला, डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला गुप्त जागी शिफ्ट केले (Rakhi Sawant Ex Husband Claims She Was Attacked In The Hospital)

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच तिची तब्येत अचानक बिघडली…

May 28, 2024

कविता- सफलता सांझी है (Poem- Saflata Sanjhi Hai)

मत भूल सफलता सांझी हैकुछ तेरी है, कुछ मेरी हैमां-बाप और बच्चे सांझे हैंकुछ रिश्ते-नाते…

May 27, 2024
© Merisaheli