बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या आगामी ‘फाइटर’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून सतत चर्चेत असते. तिचे चाहते तिच्या या नव्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्रीसुद्धा नव्या वर्षात रिलीज होणाऱ्या या सिनेमाच्या यशासाठी व्यंकटेश्वराच्या मंदिरात गेली होती.
अभिनेत्री दीपिका पादुकोण गुरुवारी संध्याकाळी बहीण अनिशा पादुकोणसोबत तिरुमला येथे गेली होती. तेथील तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
https://x.com/ANI/status/1735311393212281115?s=20
एएनआयने काल संध्याकाळी वेंकटेश्वर मंदिरातील पूजेदरम्यान दीपिका पादुकोणचा व्हिडिओ X वर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये दीपिका कॅज्युअल ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. दीपिकासोबत तिची बहीण अनिशा केशरी रंगाचा स्वेटशर्ट आणि काळी पँट अशा लूकमध्ये दिसत आहे.
दीपिका पादुकोणच्या कामाबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीचा नवीन चित्रपट फायटर जानेवारी २०२४ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री हृतिक रोशनसोबत मुख्य भूमिकेत दिसेल.
'वो अपना सा' या टीव्ही मालिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी दिशा परमार ही एक लोकप्रिय…
विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या संदर्भात तो सतत मुलाखती…
परिपूर्ण व्हॅलेंटाइन्स डे गेटवेचे नियोजन करण्यासाठी वेळ नाही आहे का? व्हिसा अधिक बचत करणाऱ्या टिप्स…
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाईपण भारी देवा पुन्हा सिनेमागृहांत…
अभिनय, नृत्य व निर्माती अशा विविध भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली…
मॉडर्नाइजेशन के इस दौर में हर चीज़ के मायने बदल रहे हैं, रिश्तों के भी.…