Marathi

वेगळ्या चवीचे पंजाबी पद्धतीने बनवलेले कैरीचे लोणचे (Different Flavour: Punjabi Style Mango Pickle)

साहित्य :

१/२ किलो कैऱ्या (लहान तुकड्यांत कापलेल्या)

१/४ कप चणे, १ कप मोहरीचे तेल

१-१ टीस्पून बारीक कुटलेली बडीशेप, हळद पावडर आणि मेथी दाणे बारीक करून

२-२ चमचे मोहरी, कलौंजी, लाल तिखट

चवीनुसार मीठ

कृती :

कढईत तेल कडकडीत गरम करा.

तेलातून धूर येऊ लागला की आच बंद करा.

तेल थंड होण्यासाठी ठेवा.

एका मोठ्या भांड्यात कैरीचे तुकडे, सर्व मसाले, मीठ, अर्धी वाटी तेल आणि चणे घालून चांगले मिसळा आणि काचेच्या बरणीत ठेवा.

बारणी ४-५ दिवस उन्हात ठेवा.

नंतर त्यात उरलेले तेल टाका, म्हणजे लोणचे तेलात चांगले बुडेल.

लोणचे पुन्हा दोन आठवडे उन्हात ठेवा.

मधेमधे लोणचे ढवळत रहा.

जेवणासोबत सर्व्ह करा.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025
© Merisaheli