अमिताभ बच्चन-शाहरूख खान पासून रणबीर सिंह पर्यंत बॉलिवूडच्या बड्या सिताऱ्यांनी विविध उत्पादनांच्या जाहिरातींसाठी व्हिडिओ शूटिंग केले आहे. त्यांच्या यादीत आता तरणाबांड स्टार टायगर श्रॉफने आपले नाव जोडले आहे. ‘निओ स्ट्रेच : फ्रीडम टू मूव्ह’ त्याचा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. प्रसिद्ध संगीत व्हिडिओ दिग्दर्शक मिहीर गुलाटी यांनी या व्हिडिओची निर्मिती केली आहे. या संगीत व्हिडिओमधून टायगर श्रॉफ सह नताशा भारद्वाज व जन्नत झुबेर रेहमानी या स्टार्सनी डॉनिअर ग्रुपचे ‘निओ स्ट्रेच फॅब्रिक’ लाँच केले असून फॅशन आणि संगीताचा सुंदर मिलाफ त्यात झाला आहे. याद्वारे टायगर सूटिंग कापडाचा ब्रॅन्ड ॲम्बेसेडर ठरला आहे.
“या प्रकल्पाचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे. या ट्रॅकमध्ये आम्हाला आलेल्या अफाट ऊर्जेचा अनुभव प्रत्येकाला यावा, यासाठी मी प्रचंड आतुर आहे,” अशा शब्दात टायगर श्रॉफने आपल्या भावना व्यक्त केल्या. तर “या व्हिडिओचे दिग्दर्शन करणे मस्त अनुभव होता. या गाण्यात संगीत, नृत्य आणि फॅशनचा सुरेख संगम झाला आहे.” अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक मिहिर गुलाटी यांनी दिली.
गोविन्दा की भांजी और कृष्णा अभिषेक की बहन बनने जा रही हैं दुल्हन. 25 अप्रैल…
सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी रामायण चित्रपटामुळे बऱ्यापैकी चर्चेत आहे. आपल्या अभिनयाने तो…
आई कुठे काय करते मालिकेतील मिलिंद गवळी यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमधून त्यांच्या मालिकेची…
अजय देवगण आणि काजोलची मुलगी नीसा देवगणचा उद्या २१ वा वाढदिवस आहे. पण नीसाची आई…
शादी के 6 साल बाद पति जोरावर से तलाक लेने का फैसला लेकर कुशा कपिला…
जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान"चे पहिले पोस्टर अलिकडेच प्रदर्शित…