Marathi

आता दररोज दिसा सुंदर (Easy Tips To Look Beautiful Everyday)

सुंदर दिसण्याची इच्छा सर्वांना असते. मग कोणताही सण किंवा समारंभ, कार्यक्रम  आला की आपण आपल्या सौंदर्याची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. लग्नाच्या निमित्तानेही आपण वेगवेगळी तयारी करतो, पण प्रश्न असा पडतो की फक्त खास प्रसंगीच का सुंदर दिसायचे? रोज का नाही?

येथे आम्ही तुम्हाला काही सौंदर्य मंत्र सांगणार आहोत जे तुम्हाला दररोज सुंदर बनवतील…

  • आपल्या त्वचेवर आणि स्वतःवर प्रेम करा
  • चेहऱ्याची, त्वचेची निगा आणि केसांची निगा राखण्याची दिनचर्या विकसित करा; ज्यात CTM – क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग समाविष्ट आहे.
  • त्वचा नियमितपणे स्वच्छ करा. नैसर्गिक क्लिन्झर वापरा. कच्च्या दुधात थोडे मीठ टाकून चेहरा आणि मान कापसाच्या बॉलने स्वच्छ करणे चांगले.
  • आंघोळीच्या पाण्यात थोडे दूध किंवा गुलाबपाणी घालू शकता किंवा अर्धे लिंबू कापून त्यात घालू शकता.
  • आंघोळीचे पाणी जास्त गरम नसावे, नाहीतर त्वचा कोरडी पडेल हे लक्षात ठेवा.
  • आंघोळीसाठी साबणाऐवजी बेसन, दही आणि हळदीची पेस्ट वापरू शकता.
  • आंघोळीनंतर त्वचा थोडी ओली असताना लगेच मॉइश्चरायझर लावा. यामुळे ओलावा बंद होईल.
  • आठवड्यातून एकदा नियमितपणे त्वचेला एक्सफोलिएट करा, जेणेकरून मृत त्वचा निघून जाईल.
  • त्याचप्रमाणे महिन्यातून एकदा स्पा किंवा फेशियल करा.
  • हवामान कोणतेही असो सनस्क्रीन लावण्याची सवय ठेवा.
  • या सर्वांमध्ये, तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार देखील माहित असणे आवश्यक आहे. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही तेल किंवा हेवी क्रीम आधारित लोशन किंवा क्रीम वापरावे.
  • जर तुम्हाला काळे डाग किंवा मुरुमांची समस्या असेल तर तुम्ही हायलुरोनिक ॲसिड असलेले सीरम वापरावे.
  • त्याचप्रमाणे शरीराच्या त्वचेचीही काळजी घ्या.
  • टाचांच्या भेगा, खडबडीत कोपर आणि गुडघे, कोरडी आणि काळी त्वचा आणि फुटलेल्या ओठांवर उपचार करा.
  • पेट्रोलियम जेली लावा. लिंबू चोळा, ओठ स्क्रब करा आणि क्रीम, साजूक तूप किंवा लिप बाम लावा.
  • बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळा आणि त्याने गुडघे आणि हाताचे कोपर यांचेवर स्क्रब करा.
  • झोपण्यापूर्वी तुमच्या गुडघ्यांना आणि कोपरांना नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज करा. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर असून काळपटपणा दूर करते.
  • भेगा पडलेल्या टाचांसाठी – तुमचे पाय कोमट पाण्यात काही काळ भिजवा आणि नंतर ते स्क्रबर किंवा प्युमिस स्टोनने हलक्या हाताने घासून घ्या.
  • आंघोळीनंतर पाय आणि घोट्यालाही मॉइश्चरायझ करा. इच्छित असल्यास, पेट्रोलियम जेली लावा.
  • पायांची त्वचा टॅन झाली असल्यास किंवा काळवंडली असल्यास ॲलोवेरा जेल लावा.
  • नखांकडे दुर्लक्ष करू नका. ती स्वच्छ ठेवा. नियमितपणे ट्रिम करा.
  • स्वस्त्यातली नेल पेंट लावणे टाळा, यामुळे नखे पिवळी पडतात.
  • जर तुम्हाला नखांना नैसर्गिक चमक आणायची असेल तर लिंबू कापून नखांवर हलक्या हाताने चोळा.
  • नखांना नियमितपणे मॉइश्चरायझ करा. रोज रात्री सर्व काम आटोपल्यावर झोपण्यापूर्वी नखांवर आणि बोटांवर मॉइश्चरायझर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढेल. नखे मऊ होतील आणि आजूबाजूची त्वचाही निरोगी होईल.
  • क्यूटिकल क्रीम लावा. आपण क्यूटिकल तेल देखील वापरू शकता.
  • क्यूटिकल ऑइल किंवा व्हिटॅमिन ई असलेल्या क्रीमने मसाज करा.
  • नखांना निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी खोबरेल किंवा एरंडेल तेलाने मसाज करा.
  • त्याचप्रमाणे केसांच्या आरोग्याकडेही लक्ष द्या.
  • केसांना नियमित तेल लावा. नारळ किंवा बदामाच्या तेलाने मसाज करा.
  • आठवड्यातून एकदा केसांच्या मुळांना कोमट तेलाने मसाज करा आणि सौम्य शाम्पूने धुवा.
  • कंडिशनर वापरा.
  • आपले केस नियमितपणे ट्रिम करा.
  • कोंडा किंवा केस गळणे यासारख्या समस्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
  • सेल्फ ग्रुमिंगही महत्त्वाचं आहे, ग्रूमिंगकडे लक्ष द्या…
  • जर तुम्हाला दररोज सुंदर दिसायचे असेल तर आधी गबाळेपणा टाळा. तयार रहा.
  • वॅक्सिंग आणि आयब्रो नियमितपणे करा.
  • तोंड आणि दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. श्वासात दुर्गंधी येत असेल तर पोट स्वच्छ ठेवा. दात स्वच्छ ठेवा.
  • दिवसातून दोनदा ब्रश करा.
  • दातांचा काही त्रास असल्यास त्यावर उपचार करा.
  • चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य ठेवा.
  • चांगले कपडे घाला. तुमच्या कपड्यांना इस्त्रीची गरज असल्यास, आळशी होऊ नका.
  • जर तुम्ही चांगले कपडे घातले तर तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास मिळेल, जो तुम्हाला सुंदर बनवेल आणि तुम्हाला सुंदर वाटेल.
  • तुमचे व्यक्तिमत्व आणि त्वचेचा टोन लक्षात घेऊन पोशाख निवडा.
  • ॲक्सेसरीज तुमच्या सौंदर्यात भर घालतात. त्यांना टाळू नका.
  • चांगल्या ब्रँडचा मेकअप वापरा, पण जास्त मेकअप करणे टाळा.
  • दिवसा किंवा ऑफिसमध्ये नैसर्गिक लूकमध्ये सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा.
  • पादत्राणे देखील चांगली असली पाहिजेत, परंतु पोशाख आणि शूज निवडताना ते आरामदायी असावेत हे लक्षात ठेवा. ते तुमच्या लूकमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.
Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

सूड (Short Story: Sood)

नीलताप्लान तर मस्त केला होता… आता त्याची अंमलबजावणी होत होती. ठरवल्याप्रमाणे यामिनी ड्रायव्हिंग सीटवर बसली…

May 21, 2024

मराठी अभिनेत्री छाया कदमने नथ अन् साडी नेसून कान्स फेस्टिव्हलला लावली हजेरी (Marathi Actress Chhaya Kadam Attended Cannes Film Festival 2024 )

सध्या सगळीकडे ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलची चर्चा आहे. या फेस्टिवलमध्ये निरनिराळ्या देशातील कलाकार सहभागी…

May 21, 2024

कहानी- नीड़ के तिनके (Short Story- Need Ke Tinke)

"यह अंधेरा क्यों कर रखा है?" अनिल ने घर में घुसते ही पूछा."तुम जो न…

May 21, 2024

सुपर स्टार अक्षय कुमार ने खुद को बताया अनपढ़ आदमी और वाइफ ट्विंकल खन्ना को कहा ‘दिमाग़ वाली’ (Akshay Kumar Says Main To Anpadh Aadmi Hu Calls Wife Twinkle Khanna Dimaag wali)

अक्षय कुमार अपनी प्रोफेशनल लाइफ में जितने सक्सेसफुल हैं, पर्सनल लाइफ में उतने ही अच्छे…

May 21, 2024

अश्विनी महांगडे शेअर केला बाबांचा किस्सा, म्हणाली फोटोसाठीची नुसती झुंबड आणि… ( Ashvini Mahangade Share Her Fathers Memory)

माझ्यासोबत इव्हेंट साठी बऱ्याचदा नाना यायचे. एका कार्यक्रमाला गेलो आणि तिथे आलेल्या महिलांनी फोटो फोटो…

May 21, 2024
© Merisaheli