Entertainment Marathi

अंकिता लोखंडेला तिच्या वयावरून थेट आलियाच्या आईच्या रोलसाठी विचारलं, नेटकऱ्यांनाही तिला विचारलेला हा प्रश्न अजिबात आवडला नाही (Elvish Yadav Was Trolled For Asked Ankita Lokhande To Play Alia Bhatt Mother)

टीव्ही इंडस्ट्रीतील सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे अर्थातच अंकिता लोखंडे. अंकिता लोखंडेनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पवित्र रिश्ता या मालिकेत आधी तिने पत्नी, सून आणि नंतर आईची भूमिका साकारली. ती प्रेक्षकांनाही तेवढीच भावली. अंकिता आता जास्त करून रिअॅलिटी शोमध्येच दिसते. तिच्यासोबतच तिचा पती विकी जैनदेखील असतो. तसेच अंकिता सोशल मीडियाद्वारेही आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिच्या घरी होणाऱ्या पार्टी आणि कार्यक्रम यांचे फोटो, व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

दरम्यान, सध्या अंकिता लोखंडेचा असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात एल्विश यादव हा अंकिताला आलिया भट्टच्या आईची भूमिका करशील असं विचारताना दिसतोय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एल्विश यादवच्या पॉडकास्टमधील आहे. एल्विश यादव अंकिता लोखंडेला म्हणतो की ‘विकिपीडियावर तुझं वय हे ४० वर्ष दाखवत आहे. तर तू आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारशील का?” असा प्रश्न देताच अंकितानेही त्याला सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली की, “४० वर्षांची महिला म्हातारी असते का? मी तुला इतकी मोठी दिसते का?’

पुढे अंकिता म्हणाली, ‘आधी पवित्र रिश्तामध्ये लहान वयातही मी आईची भूमिका साकारली आहे.” तसेच यावर विकी जैन अंकिताची बाजू घेत म्हणाला की, “तिनं तिच्या वयाच्या १८ व्या वर्षी आईची भूमिका साकारली होती.” पण एल्विशनं पुन्हा त्याचा तोच प्रश्न पुढे करत तिला विचारलं ” तू आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारशील का?” मग अंकितानेही अगदी ठणकावून सांगितलं की “नाही मी आलिया भट्टची आई दिसत नाही. मुळीच नाही.’

अंकितावर केलेल्या या कमेंटनंतर एल्विशचा हा व्हिडीओ रेडिट या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनाही त्याने विचारलेला हा प्रश्न अजिबात आवडला नाही. त्याला सोशल मीडियावर यासाठी चांगलंच ट्रोल केल जात आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की ‘या अशिक्षितला कोणी तरी सांगा की आलिया भट्ट ही ३२ वर्षांची आहे. आलिया आणि अंकिता या दोघी त्यांच्या वयात फीट आणि सुंदर दिसतात.’ तर, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘एल्विश तू लूजरची भूमिका साकारशील का? तू खूप मोठा लूजर आहे.’ तर अजून एका युजरने कमेंट करत प्रश्न विचारला आहे की, ‘लोकं त्याच्या शोमध्ये का जातात? हाच प्रश्न एका पुरुषाला विचारला जाईल का?’ अशा पद्धतीने त्याला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे.

दरम्यान, अंकिता लोखंडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिने इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज मधून सुरुवात केली होती. त्यानंतर ती पवित्र रिश्ता या मालिकेत दिसली. या शोमध्ये तिनं 2009 ते 2014 पर्यंत काम केलं. या शोमध्ये अंकिताला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिनं झलक दिखला जा, कॉमेडी सर्कस सारख्या वेगळ्या शोमधून तिचं अभिनय कौशल्य दाखवलं. सध्या अंकिता ही ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्ये दिसत आहे. इथे ती तिचा नवरा विकी जैनसोबत आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

‘पीकू’ की दोबारा रिलीज़ पर इमोशनल नोट के साथ दीपिका पादुकोण ने इरफान खान को याद किया… (Deepika Padukone remembers Irrfan Khan with an emotional note on the re-release of ‘Piku’…)

अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, इरफान खान स्टारर फिल्म ‘पीकू’ साल 2015 में आई थी. पिता-पुत्री…

April 19, 2025

कहानी- आसमान साफ़ है (Short Story- Aasman Saaf Hai)

"हमेशा अपने बच्चों की मां बनकर जीने के अलावा नारी को कभी-कभी अपने पति की…

April 19, 2025
© Merisaheli