Marathi

महाराष्ट्राची हास्यजत्रानंतर गौरव मोरे गाजवतोय हिंदी शो, जुही चावलासोबत धमाल जुगलबंदी चर्चेत ( Gaurav More Share Cute Bond With Juhi Chavla On The Set Of Madness Machayege )

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे ! कॉमेडीची अचूक संधी साधत प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा गौरव आता एक हिंदी शो गाजवताना दिसतोय. घराघरांत लोकप्रिय झालेला हा अभिनेता ” फिल्टरपाड्याचा बच्चन ” म्हणून ओळखला जातो. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने महाराष्ट्रातील सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि आता हिंदीत तो मंच गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गौरवच्या या धमाकेदार कॉमेडीवर हिंदी प्रेक्षकही खळखळून हसत आहेत. तो प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन करत आहे. सध्या सोशल मीडियावर गौरव आणि बॉलिवुड अभिनेत्री जूही चावला यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय आणि त्यामागचं कारण देखील तितकच खास आहे.

गौरवने काही दिवसांपूर्वीच ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात दणक्यात एन्ट्री घेऊन पहिल्याच भागात जबरदस्त परफॉर्मन्स दिला. गौरवची तुफान परफॉर्मन्स जुही चावला हिला इम्प्रेस करून गेला. आता हे नेमक प्रकरण काय आहे हे बघण उत्सुकतेचा विषय ठरल आहे.

जुही चावला आणि बॉलिवुड किंग शाहरुख खान यांच्या आयकॉनिक ‘डर’ चित्रपटातील किंग खानचं पात्र गौरव रिक्रिएट करणार असून ” तू है मेरी किरण ” हे गाणं गात गौरव शाहरुखची हुबेहूब नक्कल करत असल्याचं प्रोमो मधून बघायला मिळतंय. गौरव जुहीला गुडघ्यावर बसून गुलाब देतो गुलाबाच्या पाकळ्यांची तिच्यावर उधळण करतो हे सर्व दृष्य लवकरच बघायला मिळणार असून यावर जुही काय बरं रिअॅक्ट होणार हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

गौरव या सगळ्या बद्दल बोलताना म्हणाला की ” मॅडनेस मचाएंगे ” सुरू होऊन अगदीच काही दिवस झाले आहेत आणि हिंदीत एवढा कमालीचा शो करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मराठीच्या सोबतीने हिंदी प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम ही माझ्या कामाची पोचपावती आहे आणि अजून उत्तम काम करण्याची एक प्रेरणा देखील आहे. या शो मध्ये अजून धमाल मज्जा मस्ती करायची आहे पण जूही चावला मॅमसोबत मला स्टेज शेयर करायला मिळणं हे एक सुख आहे “

गौरव ” मॅडनेस मचाएंगे ” मध्ये तुफान लोकप्रिय होत असून मराठी प्रमाणे हिंदीत सुद्धा त्याने आपल्या कमाल कामगिरीने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. आगामी काळात ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच महापरिनिर्वाण’ या चित्रपटातही तो मुख्य  भूमिका साकारणार आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

काव्य- उम्र बढ़ती जा रही है… (Poetry- Umra Badti Ja Rahi Hai…)

अब यही आवाज़ दिल कीधड़कनों से आ रही हैज़िंदगी कम हो रही हैउम्र बढ़ती जा रही…

April 24, 2024

Are you Sexually Compatible?

if it’s not just about occasional periods when a couple’s sex life is dull, then…

April 24, 2024

 मनिष पॉलने घेतली ४८ लाखांची नवीकोरी कार, म्हणाला नवं बाळ घरी आलं….(Maniesh Paul Buys Green Mini Cooper Worth Rs 48 Lakh)

लोकप्रिय टीव्ही होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलने चमकदार हिरव्या रंगाची मिनी कूपर कार खरेदी केली…

April 24, 2024

अभिनेत्री राधिका मदनच्या हस्ते ‘स्मार्ट+’ सेवेचे उद्‌घाटन : घराघरातून मनोरंजनाचे नवीन मानक स्थापन (Actress Radhika Madan Launches ‘Smart +’: New Content Service In Entertainment Industry)

डायरेक्ट टू होम अर्थात्‌ डीटीएच उद्योगाचा पाया घालणाऱ्या डिश टीव्हीने आता मनोरंजन क्षेत्रात नवा पुढाकार…

April 24, 2024
© Merisaheli