Entertainment Marathi

बाबांसाठी घेतलेली गाडी त्यांनीच पाहिली नाही, गौरव मोरेने व्यक्त केली खंत ( Gaurav More Share His Father Emotional Memory)

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घराघरात लोकप्रिय झालेला विनोदी अवलिया म्हणून गौरव मोरेला ओळखले जाते. त्याने आता हिंदीमध्येही आपली जादू दाखवायला सुरुवात केली आहे. पण त्याला सुद्धा एक भावुक बाजू आहे. जी त्याने नुकतीच मॅडनेस मचाएंगे दुनिया को हसाएंगे या शोमध्ये व्यक्त केली. गौरव मोरेला बाबा नाहीत. पण बाबांच एक स्वप्न पूर्ण करुनही त्यांना ते दाखवता न आल्याची सल अजूनही त्याच्या मनात कायम आहे.

“बाहेर फिरायला जाताना, नेहमी असं वाटायचं अरे आपल्याकडे गाडी असली पाहिजे होती. बस, ट्रेनचा प्रवास मला नक्कीच आवडतो. मी आताही तसा प्रवास करू शकतो. पण, माझे वडील नेहमी बोलायचे आपल्या घरात चारचाकी पाहिजे. तेव्हापासून मी ठरवलं होतं की, सेकंड हँड असली तरीही आपल्या घरात चारचाकी गाडी आली पाहिजे. कारण लोकांना काय वाटतं ज्याच्या घरासमोर कार तो मोठा माणूस… मी एका शोमध्ये काम करत होतो. तिथे काम करून मी पैसे साठवले आणि गाडी घ्यायचं ठरवलं.”
“गाडी घ्यायचं ठरवलं तेव्हा समोरचा माणूस बोलला दीड लाखात कार देईन. मी म्हणालो, ‘बघ माझ्याकडे फक्त १ लाख १० हजार आहेत त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही.’ मी माझ्या आईला त्याच्याकडे घेऊन गेलो की, निदान आईचं ऐकून तो पैसे कमी करेल. त्याला सांगितलं काही करून ही गाडी मला पाहिजे. माझी आईपण त्याला बोलली आम्हाला गाडी घ्यायचीच आहे. त्यावेळी ती गाडी पाहण्यासाठी मी आणि माझी आई ऐरोलीला गेलो होतो. बाबांची इच्छा होती म्हणून गाडी घेतली पण, तो आनंद पाहण्यासाठी माझे बाबा नव्हते.

२०१५ मध्ये बाबा गेले…गाडी थोडी उशिरा घेतली. केव्हा-केव्हा वाईट वाटतं आज माझे बाबा सोडून सगळेजण माझ्या गाडीत बसतात. आपण नवीन गोष्टी विकत घेतो. पण, आपण ज्यांच्यासाठी या गोष्टी घेतो ते लोक तरी आपल्याबरोबर पाहिजेत. पण, आता नवीन गाडी घेतल्यावर बाबांचा फोटो माझ्याबरोबर घेऊन चला असे तरी एकत्र फिरुया असा विचार करून मी माझं समाधान करून घेतो. आज फक्त बाबांच्या आशीर्वादामुळे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत.”
गौरवने आतापर्यंत लंडन मिसळ, बॉइज ४, सलमान सोसायटी, अंकुश, हवाहवाई, विकी वेंगलीकर यांसारख्या सिनेमातही काम केले आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षाः मेट्रो… इन दिनों- रिश्ते और प्यार से जूझती रोमांटिक म्यूज़िकल जर्नी… (Movie Review: Metro… In Dino)

रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…

July 4, 2025

पहला अफेयर- तीन दिवसीय प्यार! (Love Story- Teen Divasiy Pyar)

वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…

July 4, 2025

कहानी- आपने कहा था (Short Story- Aapne Kaha Tha)

सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…

July 4, 2025
© Merisaheli