रोजा व नमाज आणि सामुदायिक बंधनाचा महिना रमझान जवळ आला आहे. अनेकजण हा महिनाभर उपवास करतात आणि रोजा व नमाजचे पालन करतात. पण मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या पवित्र महिन्यादरम्यान अधिक काळजी घेण्याची आणि नियोजन करण्याची गरज आहे. योग्य माहितीसह ते त्यांचा उपवास कार्यक्षमपणे पार पाडू शकतात आणि त्यांच्या आरोग्याबाबत चिंता न करता या पवित्र महिन्याच्या रोजामध्ये सहभाग घेऊ शकतात.
पहाटेपूर्वीच्या सुहूरपासून सूर्यास्तनंतरच्या इफ्तारपर्यंत उपवासादरम्यान रक्तातील शर्करेच्या पातळ्या संतुलित राखणे संभाव्य चढ-उतारांमुळे आव्हानात्मक ठरू शकते. म्हणून, सुहूर व इफ्तार महत्त्वपूर्ण भोजन असले तरी त्यामधून ऊर्जा व पोषण मिळणे आवश्यक आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या काळात रक्तातील शर्करेच्या पातळ्यांमधील मोठ्या परिवर्तनांचे व्यवस्थापन करण्यासाठी काळजीपूर्वक आहाराचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
योग्य पौष्टिक आहाराव्यतिरिक्त रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर देखरेख ठेवण्याची देखील शिफारस केली जाते. कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर रिअल-टाइम देखरेख ठेवण्यासाठी सोईस्कर व वेदना-मुक्त मार्ग आहे. संतुलित आहाराचे सेवन व नियमितपणे ग्लुकोज मॉनिटरिंगसह मधुमेह असलेल्या व्यक्ती सुरक्षितपणे उपवास करू शकतात आणि या पवित्र महिन्यादरम्यान त्यांचे आरोग्य उत्तम ठेवू शकतात.
सध्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई येथे डीआरएनबी एण्डोक्रिनोलॉजी करत असलेले एमबीबीएस, डीएनबी (जनरल मेडिसीन) डॉ. प्रथमेश देवरूखकर म्हणाले, ”कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) रमजानदरम्यान उपवास करणाऱ्या मधुमेही व्यक्तींसाठी महत्वपूर्ण आहे. सीजीएम देणारा रिअल-टाइम ब्लड शुगर डेटा उपवासापूर्वी व उपवासानंतर आहारामुळे ग्लुकोजमधील चढ-उतार ओळखण्यास आणि त्याचे व्यवस्थापन करण्यास मदत करतो. हा डेटा-संचालित दृष्टिकोन आहाराचे प्रमाण, आहाराची वेळ आणि व्यायामाचे समायोजन करण्यास मदत करतो, ज्यामुळे रक्तातील शर्करेवर उत्तम नियंत्रण राहते आणि आत्मविश्वास येतो.”
यंदा रमझानदरम्यान मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी खाली काही टिप्स देण्यात आल्या आहेत:
नियोजन करत, आरोग्यदायी आहार निवडी करत आणि आरोग्याची काळजी घेत मधुमेहावर नियंत्रण ठेवता येऊ शकते आणि यंदा रमझानचा आनंद घेता येऊ शकतो.
- यूं तो मेरा स्वभाव है कि मैं किसी से बेवजह उलझती नहीं, लेकिन कोई…
कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) इन दिनों अपने फिजिकल ट्रांसफॉर्मेशन (Kapil Sharma's Body Transformation) को…
आई येता जाता लग्न कसे महत्त्वाचे आहे हे तिला समजावून सांगणाचा क्षीण प्रयत्न करीत होती.…
स्टार प्रवाहवर २८ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेतून प्रेक्षकांची…
"मैं 45 साल का हो गया हूं. मनमौजी ज़िंदगी जीता हूं. अच्छा दोस्त बनने का…
चित्रपटांमध्ये जे थरारक आणि धडकी भरवणारे स्टंट्स आपण पाहतो. ते बहुतांश वेळा मुख्य कलाकार स्वत:…