Marathi

‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच… (Hazaar Vela Sholay Pahilela Manus Movie Announcement Siddharth Jadhav)

हिंदी चित्रपटाच्या इतिहासात “शोले’ हा चित्रपट फार महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटानं लोकप्रियतेचे मापदंड बदलले, अनेक कलाकारांचं करिअर घडवलं. शोले हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. म्हणूनच “शोले” या चित्रपटाच्या महानतेला “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या मराठी चित्रपटातून सलाम केला जाणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. नुकतेच मुंबई फेस्टिवल येथे या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले होते.

केवळ कथानकच हटके नाही तर, या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम बालकलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून, अभिनेते आनंद इंगळे, समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार असला तरी, अद्याप याची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

“हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाच्या नावातूनच “शोले” या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं, पण चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

सलमान खान के घर के बाहर चली गोलियां, बाइक पर सवार थे दो अज्ञात लोग, जांच में जुटी पुलिस (Firing Outside Salman Khan House Two People Came On Bike)

बॉलीवुड के भाईजान और फैंस की जान कहे जाने वाले सलमान खान के मुंबई स्थित…

April 14, 2024

लघुकथा- असली विजेता (Short Story- Asli Vijeta)

उनके जाने के बाद उसने दुकान को पूर्ववत ही संभाल रखा था.. साथ ही लेखिका…

April 13, 2024
© Merisaheli