Marathi

हुमा कुरेशीही झालेली बॉडी शेमिंगची शिकार, वेदना शेअर करत म्हणाली… (Huma Qureshi’s Pain Spilled over Body Shaming)

बॉलिवूड अभिनेत्री केवळ त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयासाठीच नव्हे तर त्यांच्या फिटनेससाठीही ओळखल्या जातात, असे असूनही इंडस्ट्रीत अनेक अभिनेत्रींना बॉडी शेमिंगला बळी पडावे लागते. अर्थात, चित्रपटांमध्ये दिसणार्‍या अभिनेत्री आपले शरीर तंदुरुस्त आणि टोन ठेवण्यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळतात, तरीही अनेकदा त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. हुमा कुरेशी ही त्यापैकीच एक. हुमाने तिच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, पण ती बॉडी शेमिंगचीही शिकार झाली आहे. अभिनेत्रीने तिच्या वेदनांबद्दल सांगितले की तिच्या शरीराच्या अवयवांना झूम करून वर्तुळे तयार केली गेली होती.

हुमा कुरेशीने ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘बदलापूर’, ‘एक थी डायन’ आणि ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. अनेकदा तिच्या शरीरासाठी तिला ट्रोल केले जाते. अलीकडेच, हुमा कुरेशीने करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्याची आठवण करून देताना तिला बॉडी शेमिंगचा सामना कसा करावा लागला ते सांगितले.

एका मुलाखतीत हुमाने चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देत, तिने तिला आलेले बॉडी शेमिंगचे अनुभव शेअर केले. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 20 व्या वर्षी तिला अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता, ज्याची आठवण करून ती आजही उदास होते. हुमाने सांगितले की, एका मासिकाच्या मुखपृष्ठावर तिच्यासाठी आक्षेपार्ह गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या आणि काही रिव्ह्यूमध्ये तिच्या शरीराबद्दल कमेंट करण्यात आल्या होत्या.

मासिकातील त्या लेखाचा संदर्भ देताना हुमा म्हणाली की, त्या काळात लेखांमध्ये तिच्या गुडघ्यांबद्दल कमेंट करण्यात आल्या होत्या. एवढेच नाही तर तिच्या कपड्यांबद्दल आणि पेहरावाबद्दलही विविध गोष्टी सांगितल्या जात होत्या जसे की तिने काय परिधान केले होते वगैरे वगैरे. यासोबतच लोकांनी फोटो झूम करून शरीराच्या काही भागांवर वर्तुळे काढली, ते केवळ पाहिलेच नाही तर शेअरही केले.

वेदनांचे वर्णन करताना, हुमाने हे देखील सांगितले की लोकांनी तिला वजन कमी करण्याचा आणि लिपोसक्शन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला कसा दिला. एकदा एका चित्रपट समीक्षकाने म्हटले होते की हुमा एक सुंदर चेहरा असलेली एक उत्तम अभिनेत्री आहे, परंतु मुख्य प्रवाहातील अभिनेत्री होण्यासाठी तिचे वजन जवळजवळ 5 किलो जास्त आहे. हुमावर विश्वास ठेवला तर, ते प्रीव्ह्यू वाचल्यानंतर, अभिनेत्री खूप दुःखी झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रणबीरची पत्नी म्हणून करिश्मा कपूरला पसंत होती ‘ही’ अभिनेत्री (karishma kapoor wants sonam kapoor to be wife of ranbir kapoor actress share her opinion in coffee with karan show)

सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी रामायण चित्रपटामुळे बऱ्यापैकी चर्चेत आहे. आपल्या अभिनयाने तो…

April 19, 2024

आई कुठे काय करते मालिका सेट कुठे माहितीये? अनिरुद्धनेच सांगून टाकलं ( Where Is Aai Kuthe Kay Karte Serial Set, Anirudhha Gives Ans)

आई कुठे काय करते मालिकेतील मिलिंद गवळी यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमधून त्यांच्या मालिकेची…

April 19, 2024

अजय देवगण आणि काजोलची लेक नीसा झाली २१ वर्षांची , अभिनेत्रीने शेअर केली भावूक पोस्ट  (Kajol Shares Adorable Post Ahead Of Daughter Nysa Birthday)

अजय देवगण आणि काजोलची मुलगी नीसा देवगणचा उद्या २१ वा वाढदिवस आहे. पण नीसाची आई…

April 19, 2024

जुन्या जमान्यातील अतिशय गाजलेल्या संगीत नाटकावर बनवलेल्या ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित (Poster Released Of Musical Film “Sangeet Manapman” : Film Based On Old Classic Marathi Play)

जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान"चे पहिले पोस्टर अलिकडेच प्रदर्शित…

April 19, 2024
© Merisaheli