भारत— 6 फेब्रुवारी 2024— मूव्हीज, टीव्ही शोज व सेलिब्रिटीजवरील माहितीचा सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) द्वारे IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार हा ब्लॅक वॉरंट मधील अभिनेता जहान कपूर ह्याला देण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे. IMDb app वर प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या परफॉर्मरला ह्या पुरस्काराद्वारे मान्यता दिली जाते. जगभरातून IMDb वर येणा-या व दर महिन्याला 25 कोटींहून अधिक असलेल्या विजिटर्सच्या पेज व्ह्यूजद्वारे ही यादी तयार केली जाते व ही यादी अशा अभिनेत्यांबद्दल अचूक भाकीत करणारी ठरली आहे ज्यांच्या करिअरमध्ये अतिशय महत्त्वाचा क्षण आलेला आहे.
कपूरने विक्रमादित्य मोटवानीच्या तुरुंगातील नाट्य असलेल्या ब्लॅक वॉरंटमधील अभिनयाद्वारे आपली छाप सोडली होती व त्यामध्ये त्याने दिल्लीतील तिहार जेलमधील माजी सुपरइंटेंडंट सुनील कुमार गुप्ता ह्यांचे प्रत्यक्षातील जीवन पडद्यावर साकारले होते. थरारक मांडणी व लक्षवेधी अभिनयामुळे नावाजल्या गेलेल्या ह्या मालिकेला जगभरातील चाहत्यांनी उचलून धरले व IMDb ग्राहकांनी तिला 8.0/10 रेटिंग दिले आहे. ह्या शोच्या यशानंतर प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये कपूर तीन वेळेस टॉप 10 मध्ये गेआ होता व दोन आठवड्यांपूर्वी त्याने सर्वोच्च स्थानही पटकावले होते. कपूरच्या आधीच्या क्रेडीटसमध्ये फराज़चा समावेश आहे व 2022 मध्ये आलेला तो त्याचा पदार्पणाचा चित्रपट होता.
कपूरने म्हंटले, “IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याचा मला अतिशय आनंद होतो. तो माझा पहिलाच पुरस्कार आहे असे नाही तर तो चाहत्यांनी मला दिला आहे. हे फार स्पेशल आहे, कारण तो तुम्हा सर्वांमुळे मिळाला आहे. आम्ही जे काम केले, ते लोकांना रिलेट झाले व प्रत्येकाला माझ्याबद्दल अधिक माहिती घ्यायची होती. हे अतिशय उत्साहवर्धक आहे!”
पुरस्कार देतानाचा व्हिडिओ इथे पाहा. IMDb ग्राहक कपूरच्या फिल्मोग्राफीमधून इतर फिल्म्स व शोज आणि इतर टायटल्ससुद्धा त्यांच्या IMDb वॉचलिस्टवर imdb.com/watchlist इथे जोडू शकतात.
आधीच्या IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार विजेत्यांमध्ये कानी कुस्रुती, शर्वरी, नितांशी गोयल, मेधा शंकर, भुवन अरोरा, अंगीरा धर, आदर्श गौरव, एश्ले पार्क, आयो एडेबिरी, आणि रेगे- जियाँ पेज Page ह्यांचा समावेश होतो.
Let your looks reflect your unique personality. Tell the world who you are: seductive, charming,…
प्रत्येक क्षेत्रात महिला आपली क्षमता सिद्ध करत आहेत, नवीन यशाच्या संधी निर्माण करत आहेत. संगीत…
जागतिक महिला दिनी शेफ नताशा गांधी यांनी निवडक महिलांसमोर पनीर मखनी बिर्याणी व बटर चिकन…
बॉलीवुड के मोस्ट लवेबल कपल में से कियारा आडवाणी और सिद्धार्थ मल्होत्रा (Kiara Advani-Sidharth Malhotra)…
देसी गर्ल प्रियांका चोप्रा २०१८ मध्ये निक जोनासशी लग्न केल्यानंतर कायमची अमेरिकेत स्थलांतरित झाली. तिचे…
मुलगी दुआच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण तिच्या प्रसूती सुट्टीचा आनंद घेत आहे. गेल्या वर्षीपासून, दीपिका एका…