Marathi

जयपूरच्या रिया सिंघाने पटकावला मिस युनिव्हर्स इंडिया बनण्याचा किताब (Jaipur Rhea Singha Became Miss Universe India 2024)

काल राजस्थानच्या जयपूरमध्ये ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2024’ चा ग्रँड फिनाले झाला, ज्यामध्ये जयपूरची रहिवासी असलेल्या रिया सिंघाने ‘मिस इंडिया युनिव्हर्स 2024’चा किताब पटकावला. रियाला मिस इंडिया युनिव्हर्सचा ताज बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने घातला.

2024 सालचा ‘मिस इंडिया युनिव्हर्स’चा मुकुट 18 वर्षीय गुजराती मुलगी रिया सिंघा हिला देण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या 51 स्पर्धकांना पराभूत करून रियाने हे विजेतेपद पटकावले आहे.

स्पर्धेचे सर्व टप्पे पार करून विजेती ठरलेल्या रिया सिंघाला बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा मुकुट घातला. या स्पर्धेत प्रांजल प्रिया ही प्रथम उपविजेती तर छवी वर्ग द्वितीय उपविजेते ठरली.

जेव्हा उर्वशी रौतेलाने रिया सिंघाला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा मुकुट घातला तेव्हा रियाच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती आनंदाने रडू लागली. रियाने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे.

रिया सिंघा आगामी मिस युनिव्हर्स 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब पटकावल्यानंतर रियाने मीडियाशी संवादही साधला.

बोलत असताना रिया म्हणाली – मला वाटते की मी या ताजची पात्र आहे. या मुकुटासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. आणि आता हा मुकुट परिधान करून मला खूप अभिमान वाटत आहे.

गुजराती मुलगी रिया सिंघा ही अहमदाबादची रहिवासी आहे. अहमदाबादच्या महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. शालेय जीवनापासूनच रिया मॉडेलिंग आणि स्पर्धांमध्ये खूप सक्रिय आहे.

सध्या रिया अहमदाबादमधील एका विद्यापीठातून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहे. रियाने नुकताच ‘मिस टीन अर्थ 2023’चा किताब पटकावला होता. या विजेतेपदापूर्वी रियाने ‘मिस टीन युनिव्हर्स 2023’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षाः मेट्रो… इन दिनों- रिश्ते और प्यार से जूझती रोमांटिक म्यूज़िकल जर्नी… (Movie Review: Metro… In Dino)

रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…

July 4, 2025

पहला अफेयर- तीन दिवसीय प्यार! (Love Story- Teen Divasiy Pyar)

वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…

July 4, 2025

कहानी- आपने कहा था (Short Story- Aapne Kaha Tha)

सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…

July 4, 2025
© Merisaheli