Marathi

ज्युनियर मेहमूद यांच्याकडे उरलेत शेवटचे ४० दिवस, पोटाच्या कर्करोगाशी झुंज देतायत अभिनेते (Jr Mehmood is battling with stage 4 stomach cancer, Johnny Lever, Master Raju visits actor)

60 आणि 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते ज्युनियर मेहमूदबद्दल वाईट बातमी येत आहे. सध्या अभिनेते कॅन्सरशी लढा देत आहे , त्याची प्रकृती गंभीर आहे. जॉनी लीव्हर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना कर्करोग झाल्याचे समजले आणि त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये ज्युनियर महमूदला पाहून त्यांना ओळखणे कठीण झाले होते. त्यांची अवस्था पाहून त्यांचे सर्व चाहते निराश झाले आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते ज्युनियर मेहमूद हे पोटाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत जे चौथ्या टप्प्यात पोहोचले आहेत. त्यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, ज्युनियर महमूद गेल्या दोन वर्षांपासून आजारी आहेत, परंतु त्यांना आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या होत्या, ज्यासाठी ते उपचार घेत होते, परंतु नंतर अचानक त्यांचे वजन खूप कमी होऊ लागले. सर्व चाचण्या केल्यावर कळले की त्यांना पोटाचा कर्करोग आहे, जो यकृत आणि फुफ्फुसात पसरला होता. त्यांना कावीळही झाली होती. डॉक्टरांनी त्यांना 40 दिवसांचा वेळ दिला आहे, सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत.

ज्युनियर महमूदच्या आजारपणाची बातमी मिळताच जॉनी लीव्हर त्यांना भेटायला गेले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये मेहमूद बेडवर असून जॉनी लीव्हर त्यांच्याशी बोलत आहे. महमूद खूप अशक्त दिसत आहे आणि त्यांची प्रकृती खूपच खराब आहे. जॉनी लीव्हरही त्यांना आर्थिक मदत करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

यानंतर मास्टर राजू ज्युनियर महमूदला त्यांच्या घरी भेटायला गेला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. फोटोमध्ये ज्युनियर महमूदची अवस्था पाहून त्याचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत आणि त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

ज्युनियर महमूदचे खरे नाव मोहम्मद नईम सय्यद आहे. ज्युनियर मोहम्मद हे नाव त्यांना ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मेहमूद यांनी दिले होते. ज्युनियर मेहमूदने राज कपूर वगळता जवळपास सर्वच सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यांनी जवळपास 256 चित्रपटांमध्ये काम केले. ज्युनियर मेहमूदचा स्टारडम इतके होते की ते त्यावेळच्या सर्वात महागड्या गाडीतून अम्पाला सेटवर यायचे. त्यावेळी मुंबईत मोजक्याच लोकांकडे ती गाडी होती. या अभिनेत्याने ‘ब्रह्मचारी’, ‘दो रास्ते’, ‘आँ मिलो सजना’, ‘कटी पतंग’, ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘कारवां’ सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे बहुतेक चित्रपट रौप्यमहोत्सवी होते.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षा: प्यार और रिश्ते की ख़ूबसूरत अलग परिभाषा देती ‘दो और दो प्यार’ (Movie Review: Do Aur Do Pyar)

रेटिंग: *** ऐसा क्यों होता है कि जिस रिश्ते में हमें सबसे ज़्यादा जुड़ाव और…

April 20, 2024

बर्लिनेल येथे जागतिक यशानंतर, आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनने आत्मपॅम्फलेट आणि झिम्मा 2 सह प्रादेशिक सिनेमांमध्ये उमटवल अव्वल ( Atmapamflet And Jhimma 2 wins Barlineil Internantion Award)

हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते आनंद एल राय यांनी आता त्यांच्या निर्मिती…

April 20, 2024

“राशी खूप हॉट दिसत आहे ” तमन्ना कडून राशीच्या लूकच कौतुक (Tamannaah Bhatia praises Raashi Khanna’s look in Armani 4 song ‘Achchacho)

अरनमानाई 4' ची सहकलाकार राशि खन्ना हीच सर्वत्र कौतुक होत असताना तमन्ना आणि राशी दोघी…

April 20, 2024
© Merisaheli